तलवार घेवून दहशत माजविणारा जेरबंद; एमआयडीसी पोलीसांची कारवाई

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ लोखंडी तलवार घेवून दहशत माजविणाऱ्या अट्टल गुन्हेगार याच्यावर कारवाई करत एमआयडीसी पोलीसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून लोखंडी तलवार जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी रात्री वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित आरोपी टिपू उर्फ बहिऱ्या सलीम शेख वय ३० रा. मेहरूण जळगाव असे अटक केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील रिलायन्स पेट्रोल पंप परिसरात संशयित आरोपी टिपू उर्फ बहिऱ्या सलीम शेख वय ३० रा. मेहरूण जळगाव हा हातात तलवार घेवून दहशत माजवित असल्याची गोपनिय माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना मिळाली. त्यानुसार पोलीसांनी शनिवारी १९ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता कारवाई करत संशयित आरोपी टिपू उर्फ बहिऱ्या सलीम शेख वय ३० रा. मेहरूण जळगाव याला अटक केली. त्यांच्याकडून लोखंडी तलवार जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल गणेश ठाकरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ रामकृष्ण पाटील हे करीत आहे.

Protected Content