चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अंकलेश्र्वर – बुऱ्हाणपूर महामार्गावर चोपडा – शिरपूर दरम्यान दोन चारचाकी वाहनांचा अपघात होऊन त्यात सेवकाबाई महादू भोई (५०) रा.सेंधवा(मध्य प्रदेश) या महिलेचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
१९ ऑक्टोबर रोजी चोपडा – शिरपूर रस्त्यावर गलवाडे शिवारात ओंकारेश्वर महादेव मंदिराजवळ सकाळी ६ : ३० वाजे दरम्यान इको गाडी क्र.जी.जे.३४ – एच.२१५० या वाहनास समोरून येणाऱ्या आयशर गाडी क्रमांक.आर.जे.२५ – जे.ए.७६७४ या वाहनाने मागून धडक दिली.
या अपघातात शेवकाबाई महादू भोई या महिलेचा मृत्यू झाला. याप्रकरणी आयशर चालक मोहम्मद अझरुद्दीन हाजी भरपूर खां (३१) रा.राजस्थान यांच्या विरुद्ध चोपडा ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बापू सावंत हे करीत आहेत.