कृषी विभागात कापूस-सोयाबीन अर्थ सहाय्य योजनेचे फॉर्म धूळ खात पडून

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मागील वर्षी अवकाळी व अतिवृष्टीमुळे जळगाव जिल्ह्यासह पारोळा तालुक्यात नुकसानीचा खूप पाऊस झाला, तसेच राज्यभरात कापूस सोयाबीन उत्पादन घट झाल्याने राज्य शासनाने शेतकऱ्यांना दिलासा म्हणून कापूस सोयाबीन अर्थ सहाय्य योजना शेतकऱ्यांना देऊन याचा लाभ मागील वर्षी २०२३ शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर असणे आवश्यक होते.

परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे राज्यभरातून शेतकऱ्यांच्या उताऱ्यावर शेतकऱ्यांनी ई पोर्टल वर जाऊन कापूस किंवा सोयाबीन नोंद केलेली असून सुद्धा कृषी विभागाने प्रसिद्ध केलेल्या यादीत नाव नसल्याने ते शेतकरी वगळले गेले परंतु कृषी विभागाने आदेश जारी करून शेतकऱ्याकडून फॉर्म भरून घेतले. असेच एकूण पारोळा तालुक्यातून कृषी विभागाकडे आज रोजी १३५० फॉर्म शेतकऱ्यांनी जमा केलेले आहेत व असेच ज्यांनी उताऱ्यावर नोंद केलेली आहे.

परंतु कृषी विभागात फार्म द्यावा लागतो असे जवळ जवळ ३००० शेतकरी अनभिज्ञ आहेत व एकूण शेतकरी कापूस सोयाबीन अर्थसहाय्य योजना पासून वंचित राहतील काय?असा प्रश्न. शेतकऱ्यांपुढे दिसत असल्याने शेतकरी विचारणा करत आहेत याबाबतीत संबंधित विभागाने लक्ष घालून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा व शेतकऱ्यांना हेक्टरी ५००० किंवा दोन हेक्टर च्या मर्यादित १००० हजार राज्य शासनाच्या या योजनेच्या लाभापासून वंचित ठेवू नये अशी मागणी स्व, शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना तसेच तालुक्यातील शेतकरी करीत आहेत

Protected Content