राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी विजया रहाटकर

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | केंद्र सरकार कडून राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी विजया रहाटकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पदावर नियुक्त झालेल्या विजया रहाटकर या पहिल्या मराठी व्यक्ती आहेत. यासंदर्भात अधिसूचना केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्रालयानं जारी केली आहे. विजया रहाटकर यांच्यावर भाजपा राजस्थान सह प्रभारी म्हणूनही जबाबदारी आहे. दरम्यान त्यांच्यासोबतच आज डॉ. अर्चना मजुमदार यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या नवीन सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

संवैधानिक दर्जा असणाऱ्या राष्ट्रीय महिला आयोगाला अत्यंत व्यापक अधिकार आहेत. महिलांच्या उन्नतीसाठी घटनात्मक आणि कायदेशीर मुद्दांचा फेरआढावा घेणे, संसदीय- वैधानिक शिफारशी करणे, महिलांविषयक धोरणात्मक बाबींसाठी केंद्र व राज्य सरकारांना सल्ला देणे, महिलांविषयक प्रश्नांचा संशोधन करणे, त्यांच्या अडीअडचणींची दखल घेऊन कारवाई करणे आदींचा त्यात प्रामुख्याने समावेश आहे. १९९२ मध्ये विशेष कायद्यान्वये स्थापन झालेल्या या आयोगाला दिवाणी न्यायालयाचे अधिकार आहेत.

Protected Content