काँग्रेस मविआसोबत निवडणूक लढेल – रमेश चैन्नीथला

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूकांच्या तोंडावर मविआ मध्ये पुन्हा बिघाडीची चर्चा रंगली आहे. काल मविआ च्या पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊत यांच्यावर नाना पटोले यांनी थेट टीपण्णी केल्यानंतर जागावाटपाची चर्चा थांबली होती. पण आज कॉंग्रेसचे महाराष्ट्र निवडणूक प्रभारी रमेश चैन्नीथला यांनी ‘मातोश्री’ वर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली असून या वादात मध्यस्थी केली आहे. त्यांनी कॉंग्रेस मविआ सोबतच निवडणूक लढेल आणि आज दुपारी 3 वाजता थांबलेल्या जागा वाटपाच्या चर्चा पुन्हा सुरू होतील असं म्हटलं आहे.

आज महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या चर्चेमध्ये नाना पटोले, संजय राऊत आणि जयंत पाटील सहभागी होणार आहेत. येत्या काही दिवसांमध्ये यादी जाहीर होणार असल्याची माहिती आहे. दरम्यान शिवसेना ठाकरे गटाकडून 15 निष्ठावंतांना तिकीट कायम ठेवले जाणार असल्याची माहिती मीडीया रिपोर्ट्समध्ये दिली आहे. मात्र शिवडी आणि चेंबूरच्या जागेवरून फेरविचार सुरू आहे. दक्षिण नागपूरच्या जागेवरूनही उबाठा आणि कॉंग्रेस मध्ये वाद आहे. ही जागा उबाठा कडे गेल्यास कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सामुहिक राजीनाम्याची धमकी दिली आहे. 2019 ला प्रमोद मानमाडेंनी अवघ्या 4 हजार जागांनी उबाठा ने ती गमावली होती. आता या जागेवर ठाकरे गट आग्रही आहे. रामटेक वरून देखील तिढा आहे.

Protected Content