भुसावळ प्रतिनिधी । येथील ताप्ती पब्लीक स्कूलतर्फे वृक्षारोपणाबाबत जनजागृती होण्यासाठी फेरी काढण्यात आले.
या रॅली मध्ये विद्यार्थ्यांनी विविध घोषणा दिल्या. ही रॅली ताप्ती पब्लीक स्कुल मधुन बालाजी नगर, गायत्री नगर, विकास कॉलनी,शिव कॉलनी,जामनेर रोड मार्गाने शाळेत समारोप झाला. यात शाळेतील पाचशे विदयार्थी विदयार्थीनी सहभागी होते. यानंतर शाळेच्या आवारात विवीध प्रकारची रोपे लावण्यात आली.
मुख्याध्यापिका निना कटलर यांनी प्रत्येक विद्यार्थ्याने किमान एक तरी झाड लावण्याचे आवाहन केले. याप्रसंगी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.