मुख्यमंत्री येणार मुक्ताईनगरात : दौऱ्याची तयारी सुरू !

मुक्ताईनगर-पंकज कपले | विधानसभा निवडणुकीच्या अर्ज भरण्याच्या आधी शहरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा होणार असून यासाठी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जय्यत तयारी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

आचारसंहिता लागण्याच्या आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुक्ताईनगरात उभारण्यात आलेल्या भव्य शिवस्मारकाच्या लोकार्पणासाठी येणार असल्याचे जवळपास निश्चीत झाले होत्ो. तथापि, त्यांचा दौरा होऊन शकला नाही. तर मध्यंतरी आचारसंहिता लागल्याने कोणत्याही कामांचे भूमीपुजन वा लोकार्पण करता येणार नाही. या पार्श्वभूमिवर शिवसेनेच्या वतीने शहरात भव्य सभेचे आयोजन करण्यात आले असून यासाठी एकनाथ शिंदे यांचा दौरा निश्चीत झाल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार साधारणपणे 20 वा 21 ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुक्ताईनगरात येण्याची शक्यता आहे. त्यांच्या दौऱ्यासाठी स्वत: आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जय्यत तयारी करण्यात येत आहे. त्यांनी कालच या संदर्भात आपल्या सहकाऱ्यांची बैठक घेऊन आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चौथ्यांदा मुक्ताईनगरला येणार आहेत. फक्त अडीच वर्षांच्या काळात मुक्ताईनगरात चार वेळेस येणारे त्ो पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत. यामुळे आता या दौऱ्याची उत्सुकता वाढीस लागली आहे.

Protected Content