अवैधपणे म्हशींची वाहतूक करणारा ट्रक पकडला

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील नशिराबाद गावाजवळील हॉटेल राणेजवळील रस्त्यावरून १८ म्हशींची अवैधपणे नियर्दयतेने कोंबून वाहतूक करणाऱ्या आयशर ट्रकवर नशिराबाद पोलीसांनी मंगळवारी १५ ऑक्टोबर रोजी पहाटे ४ वाजता कारवाई केली आहे. याप्रकरणी सकाळी ६ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील नशिराबाद गावाजवळील हॉटेल राणे समोरील रस्त्यावरून आयशर क्रमांक एमएच ४१ एयू ७४७३) मधून १८ म्हशींना कोंबून त्यांची निर्दयतने वाहतूक होत असल्याची गोपनिय माहिती एमआयडीसी पोलीसांना मिळाली. त्यानुसार पोलीसांनी मंगळवार १५ ऑक्टोबर रोजी पहाटे ४ वाजता कारवाई केली. आयशर वाहन ताब्यात घेतल्यानंतर कोंबून बांधलेल्या १८ म्हशींची सुटका करण्यात आली. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र ठाकरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी चालक फारूख खान मामुर अहमद वय ४०, क्लिनर चॉदखॉन रहमान खान वय ४२ आणि मालक जावेद खान मुख्तियार खान वय ३२ तिघे रा. खरगोन राज्य मध्यप्रदेश यांच्या विरोधात नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अतुल महाजन हे करीत आहे.

Protected Content