समोरासमोर दुचाकींची धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील आर.एल.चौफुलीजवळ दोन दुचाकीची समोरासमोर झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना १२ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता घडली होती. याप्रकरणी मंगळवारी १५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, निजोमोद्दिन रहिम शेख रा. सुप्रिम कॉलनी, जळगाव हा तरूण १२ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता सुप्रिम कॉलनीकडून अजिंठा चौफुलीकडे जात असतांना रस्त्यावरील आर.एल.चौफुलीवरून दुचाकी क्रमांक (एमएच १९ डीएच ३३३१) ने जात असतांना समोरून येणारी दुचाकी क्रमांक (एमपी १२ झेडसी ११३३०) ने जोरदार धडक दिली. या अपघातात निजोमोद्दिन रहिम शेख हा तरूण गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी मंगळवारी १५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात दुचाकीवरील अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस नाईक हेमंत जाधव हे करीत आहे.

Protected Content