व्यास मंदिरातील सप्तपर्णी झाडे काढा; मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल शहरातील शिवाजीनगर व महादेव मंदिर परिसरातील व्यास मंदिरात असलेल्या सप्तपर्णी झाडांच्या वासांमुळे होणाऱ्या आरोग्याच्या तक्रारीबाबत आज १६ ऑक्टोबर बुधवार रोजी यावल नगरपरिषदचे मुख्याधिकाऱ्यांना परिसरातील महिलांनी तक्रार निवेदन दिले.

शिवाजीनगर व महादेव मंदिर परिसरातील व्यास मंदिराजवळील गार्डनमध्यील सप्तपर्णी झाडे मोठ्या प्रमाणात लावण्यात आल्या आहे. या झाडांना मोहर व फुलांमुळे त्यांचा उग्रवास परिसरात मोठ्या प्रमाणावर होतो व त्या वासामुळे श्वास घेण्याचा त्रास होतो. या परिसरात दिवसभर भाविक येत असतात. त्यात वृद्ध व तरूण मोठ्या संख्येने येतात. सप्तपर्णी झाडांच्या वासामुळे श्वाच्छादनाच्या तक्रारी जास्त प्रमाणात वाढलेल्या आहेत. ज्यांना हृदयाचा व अस्थमाचा त्रास आहेत असे नागरिक तर घराच्या बाहेरही निघू शकत नाहीत.

या वासामुळे मागील वर्षीही तक्रार या परिसरातील नागरिकांनी दिली होती व मोर्चाही काढला होता, तेव्हाचे तत्कालीन मुख्याधिकारी म्हसे यांनी ठराव नोंदवून सप्तपर्णीची झाडे तोडण्याचे आदेशही दिले होते अशी नोंद आपल्या दफ्तरी आहे, परंतु निवडणुकीचे आदेश आल्यामुळे त्या कामास विलंब झाला होता. परंतू आता तरी नागरिकांच्या आरोग्याकडे प्रशासनाने विचारपूर्वक लक्ष करून या सप्तपर्णीच्या झाडांचा बंदोबस्त करावा. अशी मागणी परिसरातील महिलांनी मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे.

Protected Content