लांडोरखोरी उद्यानाजवळ शिवरायांचे आज्ञापत्र लावा; छत्रपती शिवाजी ब्रिगेडची मागणी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगावकरांसाठी लांडोरखोरी उद्यान निसर्गरम्य पर्यावरण पूरक आणि देखणे केलेले हे उद्यान निसर्गरम्य पर्यटन स्थळासारखे झालेले आहे. त्यामुळे तेथे रोज लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत हजारो च्या संख्येने भेट देत असतात. या उद्यानात छत्रपती शिवाजी महाराजांचे पर्यावरणबाबतचे आज्ञापत्र लावण्याच्या मागणीचे निवेदन पत्राव्दारे जळगाव वन विभागाचे उपवनसंरक्षक यांना देण्यात १५ ऑक्टोबर रोजी देण्यात आले आहे.

निवेदनात दिलेले आहे की,महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी राजांनी पर्यावरणाच्या बाबतीत महत्त्वाचे कठोर निर्णय साडेतीनशे वर्षांपूर्वी घेतलेले आहेत. होत अशी आज्ञापत्र काढलेली आहेत. त्याचीच खरी गरज आज पर्यावरण जोपासण्या साठी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक आज्ञापत्रे ही समाज मनामध्ये पर्यावरणाचा संस्कार करणारी आहेत. महाराष्ट्रातील लहान मुलांपासून अबाल वृद्धां पर्यंत छत्रपती शिवाजी राजांविषयी नितांत श्रद्धा व आदर आहे. म्हणून लांडोरखोरी सारख्या निसर्गरम्य पर्यावरण पूर्वक व देखण्या परिसरात प्रथम दर्शनी इतर थोर पुरुषांप्रमाणे छत्रपती शिवाजी राजांचे पर्यावरणा विषयीची आज्ञापत्रे आपल्या कार्यालयाने दर्शनी व लक्ष वेधून घेणाऱ्या ठिकाणी लावल्यास पर्यावरणा विषयी लोकजागृती होऊ शकेल. याबाबत आपल्या कार्यालयाची अडचण असल्यास संघटनेच्या वतीने स्वखर्चाने दर्शनी व लक्ष वेधून घेणारे ठिकाणी छत्रपती शिवरायांचे पर्यावरण पूरक आज्ञापत्र लावण्यास परवानगी मिळावी. अश्या मागणीचे पत्र छत्रपती शिवाजी बिग्रेडचे अध्यक्ष अशोक शिंदे दिले आहे.

Protected Content