जे.टी.महाजन इंजीनियरिंग कॉलेजमध्ये ‘कॅम्पस टु कॉर्पोरेट’ कार्यक्रमाला प्रतिसाद

फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । फैजपूर येथील जे.टी.महाजन इंजीनियरिंग कॉलेजमध्ये नुकताच अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी ‘कॅम्पस टु कॉर्पोरेट’ कार्यक्रम संपन्न झाला. ह्या प्रशिक्षण कार्यक्रमाद्वारे अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्याला कॉर्पोरेट जगतात यशस्वी होण्यासाठी आवश्यक कौशल्य, ज्ञान देण्यात आले. विद्यार्थ्यांना परिसर मुलाखतीसाठी लागणारे कौशल्य विकसित करणे, आत्मविश्वास वाढवणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. सदर कार्यक्रम पुण्याच्या रीलायेबल आयटी स्कूल च्या माध्यमातून आयोजीत करण्यात आला.

परिसर मुलाखतीसाठी रिसुमे हा तुमचा सगळ्यात महत्त्वाचे साधन आहे की ज्यामध्ये तुम्ही तुमचे स्किल, एक्सपिरीयन्स तुमच्या अचिवमेंट हे सगळे प्रभावीपणे कसे मांडणी करावी हे शिकवले. सोबतच मॉक जीडी पीआय घेवून प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतंत्र प्रशिक्षण देण्यात आले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष शरद महाजन, उपाध्यक्ष उल्हास चौधरी, मार्तंड भिरुड, सचिव विजय झोपे व सर्व संचालक मंडळ तसेच महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ.आर.डी.पाटील, प्र.प्राचार्य डॉ.के.जी.पाटील, उपप्राचार्य डॉ.जी.ई.चौधरी, सर्व विभाग प्रमुख डॉ डी.ए.वारके , प्रा. डी.आर.पाचपांडे, प्रा. वाय.आर.भोळे, डॉ.के. एस.भगत, प्रा.ओ.के. फिरके, प्रा मोहिनी चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले. या प्रशिक्षणाच्या आयोजनासाठी प्रा.ए.बी.नेहेते, प्रा.एम.जी. भंडारी, प्रा.जी.डी.बोंडे, प्रा.टी.डी. गारसे, प्रा.स्वप्नाली वाघुळदे यांनी परिश्रम घेतले.

Protected Content