भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुंबईत बाबा सिद्दीकी यांच्या हत्येच्या घटनेनंतर महाराष्ट्र पोलीस व सुरक्षा यंत्रणा सतर्क झाले असून या स्पर्शभूमीवर एअरपोर्ट, रेल्वेस्थानक आणि बसस्थानक अशा महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा यंत्रणा देखील वाढवण्यात आली आहे. रविवारी १३ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजता भुसावळ रेल्वे स्थानकावर प्रवाश्यांच्या बॅगेची तपासणी सुरू असतांना एका प्रवाशाच्या बॅगेत गावठी पिस्तूल आणि ८ जिवंत काडतूस आढळून आल्याने खळबळ उडाली. याप्रकरणी संशयित आरोपी प्रकाश अशोक मुंडे रा.परळी वैजनाथ जि. बीड याला अटक करण्यात आली आहे.
अधिक माहिती अशी की, मुंबईत बाबा सिद्दीकी यांच्या हत्येच्या घटनेनंतर महाराष्ट्र पोलीस व सुरक्षा यंत्रणा सतर्क झाले असून या स्पर्शभूमीवर एअरपोर्ट, रेल्वेस्थानक आणि बसस्थानक अशा महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा यंत्रणा देखील वाढवण्यात आली आहे. दरम्यान भुसावळ रेल्वे स्थानकावर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून प्रत्येक प्रवाशाची साहित्याची तपासणी केली जात आहे. रविवार १३ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजता भुसावळ रेल्वे स्थानकावर तपासणी दरम्यान महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या वतीने प्रवाशांच्या बॅगेची तपासणी करत असतांना एका बॅगमध्ये गावठी पिस्तूल व ९ जिवंत काडतुस आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी प्रकाश अशोक मुंडे रा. परळी वैजनाथ जि. बीड या संशयित आरोपीला अटक करण्यात आले आहे. त्यांची लोहमार्ग पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. याबाबत भुसावळ लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.