वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकरांचे वडील विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात

अहिल्यानगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर आता आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीमध्ये आपलं नशीब आजमवणार आहेत. दिलीप खेडकर हे अहमदनगर मधील शेवगाव पाथर्डी मधून आपले नशीब आजमवणार आहेत. प्रशिक्षणार्थी असलेल्या पूजा खेडकरने बेकायदेशीरपणे मागण्या केल्या होत्या. यावरून पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी या विरूद्ध तक्रार केली आणि पुढे पूजा खेडकर निलंबित झाली.

दिलीप खेडकर यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याचा मानस व्यक्त केला आहे. लोकसभेत प्रस्थापितांचा त्यांच्यामुळे पराभव झाला. परिणामी खेडकर कुटुंबाला त्रास दिला जात आहे. पण अशा परिस्थितीतही आपण विधानसभा लढवणार असे ते म्हणाले आहेत.

दिलीप खेडकर हे माजी सरकारी कर्मचारी आणि प्रोबेशनरी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे वडील आहेत. दिलीप यांना महाराष्ट्र सरकारने दोनदा निलंबित केले होते. लाचखोरी आणि भ्रष्टाचाराच्या आरोपावरून खेडकर यांना दोन्ही वेळा निलंबित करण्यात आले होते. आयएएस अधिकारी होण्यासाठी अपंगत्वाचे प्रमाणपत्र खोटे केल्याचा आरोप असलेली त्यांची मुलगी पूजा खेडकर यांच्याभोवती सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर हे आरोप समोर आले आहेत.

Protected Content