राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शिवरायांचे मंदिर उभारणार : उद्धव ठाकरे

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण देशाचे दैवत असून याचमुळे आम्ही सत्ता आल्यावर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शिवरायांचे मंदिर उभारणार असल्याची महत्त्वाची घोषणा आज उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या दसरा मेळाव्यात केली.

आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर पार पडला. यात उद्धव ठाकरे हे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. त्यांनी अपेक्षेनुसार केंद्र व राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. विशेष करून त्यांनी राज्य सरकारवर टीका करताना अतिशय आक्रमक पवित्र घेतल्याचे दिसून आले. याप्रसंगी त्यांनी एका अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यावर केलेले भाषण हे महत्त्वाचे मानले जात आहे.

याप्रसंगी उद्धव ठाकरे म्हणाले की आम्ही श्रीरामाचे भक्त आहोत आम्ही नक्कीच जय श्रीराम म्हणतो पण याच्या जोडीला आम्ही जय शिवराय हे देखील म्हणतो. भारताच्या इतिहासातील सर्वात कर्तबगारी राजा म्हणून शिवरायांची ख्याती आहे. ते संपूर्ण देशाचे दैवत आहे आमच्यासाठी सुद्धा ते दैवत आहेत. यामुळे राज्यात आमची सत्ता आल्यास प्रत्येक जिल्ह्यात शिवरायांचे भव्य मंदिर उभारण्यात येईल. या मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या देदीप्यमान जीवन कार्याची संपूर्ण माहिती देण्यात आलेली असेल. हे मंदिर सर्वांना महाराजांच्या तेजस्वी कार्याची सातत्याने आठवण करून देईल असे उद्धव ठाकरे याप्रसंगी म्हणाले.

Protected Content