गणेशवाडी हत्या प्रकरणी तीन आरोपींना अटक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव शहरातील गणेशवाडी परिसरातील रणछोड नगरामध्ये एका महिलेच्या डोक्यात लोखंडी हत्याराने वार करून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी १० ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली होती. या प्रकरणी तीन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे.

सदर गुन्ह्याच्या घटनास्थळाची पाहणी करून तिथे मिळालेले प्रथम दर्शनी पुराव्यावरुन बौधीक कौशल्याचा वापर करून आरोपी लालबाबु रामनाथ पासवान, वय ४३, रा. सम्राट कॉलनी जुना मेहरुण रोड जळगाव यास ताब्यात घेवून त्यास विश्वासात घेवून विचारपुस केली असता असे उघड झाले की, आरोपी लालबाबु याची पत्नी वंदना हिने तिच्या ओळखीचे सरला धर्मेंद्र चव्हाण व राजेंद्र उर्फ आप्पा पाटील यांनी मिळून सरला चव्हाण हिचे ओळखीचे मयत सुवर्णा राजेश नवाल, रा.पंचमुखी हनुमान मंदिराचे मागे जळगाव यांना भेटून त्यांना पैश्यांची आवश्यकता असल्याचे सांगीतले. त्यावेळी मयत सुवर्णा नवाल यांनी त्यांचे स्त्रीधन त्यांच्या कडे देवून ते गहाण ठेवून पैसे दिले होते.

मयत सुवर्णा नवाल यांनी सध्या दसरा, दिवाळी सण असल्याने पुजेसाठी त्यांचे स्त्रीधनचे सोने लागणार होते. म्हणुन त्यांनी आरोपी लालबाबु यांची पत्नी वंदना, सरला चव्हाण व राजेंद्र उर्फ आप्पा पाटील यांना वारंवार फोन करून मागणी करीत होती. परंतु लालबाबु याची पत्नी वंदना ही त्याला सोडून दुसऱ्या सोबत राहत असल्याने मयत सुवर्णा नवाल ह्या आरोपी लालबाबु पासवान यास तसेच सरला चव्हाण व राजेंद्र उर्फ आप्पा पाटील यांना वारंवार फोन करून पैश्याची मागणी करीत होत्या. त्यावेळी आरोपी लालबाबु पासवान, सरला चव्हाण व राजेंद्र उर्फ आप्पा पाटील यांनी कंटाळून एकत्रीत येवून संगणमत करून दिनांक १० ऑक्टोबर रोजी तिघांनी मयत सुवर्णा नवाल यांना पैसे द्यायचे आहेत असा बहाणा करून त्यांचे घरी जावून आरोपी लालबाबु पासवान, सरला चव्हाण व राजेंद्र उर्फ आप्पा पाटील यांनी सोबत नेलेले लोखंडी हातोड्याने मयत सुवर्णा नवाला यांचे डोक्यात मारून त्यांना जिवेठार मारल्याचे उघड झाले आहे.

त्यावरुन आरोपी १) लालबाबु रामनाथ पासवान, वय ४३, रा.सम्म्राट कॉलनी जुना मेहरुण रोड जळगाव, २) राजेंद्र उर्फ आप्पा रामदास पाटील, वय ५८, रा. म्हसावद शिवकॉलनी ता.जि.जळगाव, ३) सरला धर्मेंद्र चव्हाण, वय ४२, रा. शिवकॉलनी जळगाव यांना एमआयडीसी पो.स्टे. CCTNS NO ७१८/२०२४ भा.न्या.सं. १०३(१) या गुन्ह्यात ताब्यात घेण्यात आले आहे.

सदर ६ दिवस पोलीस कस्टडी रिमांड मिळाला असून सदर गुन्ह्याचा तपास सपोनि अनिल वाघ, नेम. एमआयडीसी पो.स्टे. हे करीत आहेत. सदरचा गुन्हा हा एमआयडीसी पो.स्टे.चे अधिकारी व अमंलदार तसेच स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव कडील अधिकारी व अमंलदार यांनी उघडकीस आणला आहे. सदरची कारवाई ही डॉ. महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, जळगाव, अशोक नखाते, अपर पोलीस अधीक्षक, जळगाव, संदीप गावीत. उपविभागीय पोलीस अधिकारी जळगाव भाग यांचे मागर्दशनाखाली करण्यात आली आहे.

Protected Content