जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील व शहरातील गरजू रुग्णांना रक्तपुरवठ्याची गरज पूर्ण व्हावी, सर्वसामान्यांना मुबलक प्रमाणात रक्त उपलब्ध व्हावे या हेतूने आरोग्य सेवा मेडिकल फाऊडेशन, या सेवाभावी संस्थेने ‘रेड प्लस ब्लड बँकेची’ सुरुवात करण्यात येत असून, या ब्लड बँकेचे उद्घाटन रविवार (दि.7 जुलै) रोजी सायंकाळी 5 वाजता करण्यात येणार आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, हा कार्यक्रम एम.जे.कॉलेज जवळील, भोईटे शाळेसमोरील ब्लड बँकेच्या वास्तूत राज्याचे जलसंपदा व वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली तसेच राज्याचे सहकार राज्यमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. तर डोनर रूमचे उद्घाटन माजी मंत्री सुरेशदादा जैन, एस.डी.पी. मशीनचे उद्घाटन ॲड. रोहिणी खडसे-खेवलकर आणि रक्तदान शिबिराचे उद्घाटन आमदार राजू मामा भोळे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून महापौर सीमा भोळे, उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे, जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे, मनपा आयुक्त डॉ.उदय टेकाडे, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.पंजाबराव उगले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.भास्कर खैरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एन.एस.चव्हाण, अन्न व औषधी प्रशासन विभागाचे सह आयुक्त व्ही.टी.जाधव, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे बी.टी.ओ.आकाश पाटील, मनपा विरोधी पक्षनेता सुनील महाजन, गोदावरी फाऊडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, आय.ए.एम.चे सचिव डॉ.धर्मेंद्र पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या उदघाटनाच्या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान शिबिरात स्वेच्छेने रक्तदान करावे, असे विनम्र आवाहन रेड प्लस ब्लड बँकेच्या संचालकांनी केले आहे.