जळगावात महिलेचा निर्घृण खून : परिसरात खळबळ !

जळगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरातील गणेशवाडी परिसरातील रणछोड नगरामध्ये एका महिलेच्या डोक्यात लोखंडी हत्याराने वार करून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी १० ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. सुवर्णा राजेश नवाल वय ५७, रा. रणछोड नगर, गणेश वाडी जळगाव असे मयत महिलेचे नाव आहे.

याबाबत वृत्त असे की, जळगाव शहरातील गणेशवाडी परिसरातील रणछोड नगरामध्ये सुवर्णा नवल या महिला आपल्या पती राजेश नवाल यांच्यासह वास्तव्याला होत्या. त्यांचे पती राजेश नावाल हे दाना बाजार परिसरामध्ये धान्याचे व्यापारी आहेत. दरम्यान गुरुवारी १० ऑक्टोबर रोजी रात्री ८.३० वाजेच्या पूर्वी सुवर्णा नवल ह्या घरी एकट्या असताना अज्ञात व्यक्तीने त्यांच्या घरात घुसून लोखंडी वस्तूने त्यांच्या डोक्यात वार करून त्यांचा खून केला.

दरम्यान रात्री ८.३० वाजता मयत सुवर्णा नवल यांचे पती राजेश नवाल हे घरी आल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा खून कोणत्या कारणामुळे करण्यात आला या संदर्भात कोणतीही माहिती मिळालेली नाही. दरम्यान या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनांसाठी धाव घेतली आणि पुढच्या चौकशीला सुरुवात करण्यात आली आहे. भरवस्तीमध्ये एका महिलेचा खून करण्यात आल्याने जळगाव शहरामध्ये खळबळ उडाली आहे. त्यांच्या पश्चात पती राजेंद्र नवाल, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे.

Protected Content