अंगावर विज पडल्याने जवानाचा दुर्दैवी मृत्यू

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अवघ्या दोन दिवसांपुर्वीच सुट्टीवर आलेल्या ३४ वर्षीय बी. एस. बी. जवानाचा शेत शिवारातुन घरी परत येत असताना अंगावर विज पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना पाचोरा तालुक्यातील भातखंडे खुर्द शेत शिवारात सायंकाळी ५:३० वाजेच्या सुमारास घडली आहे. अंतुर्ली नं. ३ येथील बोरसे कुटुंबावर निर्सगाने मोठा आघात केला असुन देशाला एक जवान गमवावा लागला आहे

.

पाचोरा तालुक्यातील अंतुर्ली नं. ३ येथील भुषण आनंदा बोरसे (वय -३४) हे बिहार येथे एस. एस. बी. मध्ये सेवा बजावत होते. दरम्यान अवघ्या दोन दिवसांपुर्वीच भुषण बोरसे हे दिवाळीनिमित्त सुट्टी घेवुन घरी आले होते. सद्यस्थितीत नवरात्रीचा उत्सव सुरु असल्याने भुषण बोरसे हे ९ ऑक्टोबर रोजी त्यांच्या पत्नीसह पेंडकाई मातेच्या दर्शनाला गेले होते. दुपारी पेंडकाई मातेचे दर्शन घेवुन परतल्यानंतर भुषण बोरसे हे त्यांचे भातखंडे खुर्द शिवारात असलेल्या शेतात वडिलांना मदत करण्यासाठी गेले होते. यावेळी सर्वत्र ढगाळ वातावरण निर्माण झाले असतानाच सायंकाळी ५:१५ वाजेच्या सुमारास वडिलांना बैलगाडी जुपुंन देत भुषण बोरसे हे स्वत: मोटरसायकल वरुन बैलगाडी मागे येत असतांनाच जोरात विजांचा गडगडाट झाला. क्षणार्धातच भुषण बोरसे हे मोटरसायकलवरुन जमिनीवर कोसळले व त्यांचा जागेवर दुर्दैवी मृत्यू झाला. हा संपूर्ण प्रकार भुषण बोरसे यांच्या वडिलांच्या डोळ्यासमोर झाल्याने आनंदा बोरसे यांनी एकच हंबरडा फोडला.

Protected Content