अमळनेरात मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानार्गंत भव्य मेळाव्याचे आयोजन

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत अमळनेरात 11 ऑक्टोबर रोजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींचा सन्मान सोहळा तसेच महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन ज्योती अभियान अंतर्गत महिला बचत गट सदस्यांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती कॅबिनेट मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी दिली.


सदर मेळाव्यास मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, उपुख्यमंत्री ना.फडणवीस व ना.अजित पवारांची राहणार उपस्थिती राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.सदर मेळावा प्रताप महाविद्यालय अमळनेर येथे दुपारी 1 वाजता होणार आहे. यावेळी महत्वपूर्ण विविध विकास कामांचाही शुभारंभ होणार आहे.यावेळी प्रमुख उपस्थिती केंद्रीय रक्षा खडसे, ग्रामविकास मंत्री ना गिरीश महाजन,पालकमंत्री गुलाबराव पाटील, महिला व बालविकास मंत्री ना अदिती ठाकरे व खासदार स्मिताताई वाघ यांची उपस्थिती लाभणार आहे.

सदर मेळाव्याची जय्यत तयारी प्रताप महाविद्यालयात सुरू असून यासाठी सर्व महिला भगिनींना अतिशय सन्मानाने घरपोच पत्र पाठवून निमंत्रण दिले जात आहे. बजेट अधिवेशनात उपुख्यमंत्री अजित पवारांनी लाडकी बहिण योजनेची घोषणा केल्यानंतर मंत्री अनिल पाटील यांनी अमळनेर मतदासंघांत एकही महिला या योजनेपासून वंचित राहू नये तसेच अर्ज भरताना त्यांची फिरफिर व आर्थिक लूट होऊ नये यासाठी शहरात नगरपरिषद तर ग्रामीण भागात ग्रामपंचायत व अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून विविध ठिकाणी सुविधा केंद्र उभारल्याने लाभार्थी महिलांची सोय होऊन अमळनेर मतदासंघांत 100 टकके महिला भगिनीचे अर्ज भरले जाऊन त्या पात्र देखील ठरल्या आहेत.याशिवाय त्यांच्या खात्यावर तीन ते चार हफ्त्यांचे पैसे देखील पडल्याने त्या आर्थिक सक्षम होऊन विशेष करून ग्रामीण भागात आर्थिक उलाढाल वाढली असल्याचे मंत्री अनिल पाटील यांनी सांगितले. या लाभार्थी महिला भगिनीचा सन्मान होऊन त्यांच्याशी तसेच महिला बचत गटाच्या सदस्यांशी हितगुज व्हावे तसेच त्यांच्या इतर काही अडचणी असतील तर त्या देखील समजून घ्याव्यात यासाठीच मुख्यमंत्री व दोन्ही उपुख्यमंत्री स्वतः येत असून मोठ्या उत्साहात हा मेळावा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सदर मेळाव्याच्या निमित्ताने खालीलप्रमाणे दिलेल्या योजनांचा होणार शुभारंभ- एकुण सर्व कामांची रक्कम १७६०.४० कोटी

तापी विकास महामंडळ जळगाव (निम्न तापी प्रकल्प
1. लोअर तापी प्रकल्प पाडळसरे ता. अमळनेर जि. जळगाव अंतर्गत उपसा सिंचन योजना क्र.१ ते ५ मध्ये २५६५७ हेक्टर जमीन सिंचनासाठी पाईप द्वारा पाणी पुरवठा वितरण नेटवर्कचे पंप हाऊस सह बांधकाम रक्कम 1010.19 कोटी

२. महाराष्ट्र शासनाच्या नगरोत्थान महाअभियान योजने अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या नगरोत्थान महाअभियान योजने अंतर्गत अमळनेर शहर वासीयांना २४ तास पाणीपुरवठा योजना रक्कम 197.00 कोटी

केंद्रीय मार्ग निधी प्रकल्प
१. रामा-39 ते जांभोरा ढेकू सारबेटे हेडावे अमळनेर शिरसाळे तरवाडे वावडे मांडळ रस्ता प्रजिमा-५१ कि.मी. ५/२०० ते २५/६०० ची सुधारणा करणे ता. अमळनेर जि. जळगाव रक्कम 47.68 कोटी

हायब्रीड अन्युटी अंतर्गत रस्ते
1. आमलााड मोड शहादा सांगवी हातेड अमळनेर पारोळा रस्ता रा.मा. क्र.1 कि.मी. १४९/५७० ते १८२/२०० ची सुधारणा करणे. ता. अमळनेर जि. जळगांव रक्कम 206.00 कोटी
2. वावडे जानवे बहादरपूर पारोळा कासोदा रोड प्रजिमा-46 कि.मी. १४/०० ते ३८/९०० ची सुधारणा करणे. ता. २ अमळनेर जि. जळगांव, रक्कम 130.00 कोटी

आपत्ती सौम्यीकरण कामे पूर प्रतिबंधक कामे, आर्च बंधारा बांधणे व पुलाचे बांधकाम करणे, दुष्काळ प्रतिबंधक कामे ता. अमळनेर जि. जळगाव,
१. सार्वजनिक बांधकाम विभाग अमळनेर सानेनगर आर्च बंधारा बांधणे व पुलाचे बांधकाम करणे एकुण कामे रक्कम 25.39 कोटी
२. सार्वजनिक बांधकाम विभाग अमळनेर आर्च बंधारा बांधणे एकुण कामे रक्कम 71.12 कोटी
३. सार्वजनिक बांधकाम विभाग अमळनेर पूर प्रतिबंधक संरक्षण भिंतीचे बांधकाम करणे रक्कम 6.20 कोटी
४. जलसंपदा विभाग जळगाव निम्न तापी विभाग अमळनेर अंतर्गत दुष्काळ प्रतिबंधक कामे एकुण रक्कम 7.83 कोटी

मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा-2 (बचें-1) संशोधन व विकास अंतर्गत
१. मुंगसे ते पातोंडा ते सोनखेडी ते निमझरी रस्ता (TR-03, VR-26, 66) एकुण लांबी ११.०९० की.मी. रक्कम 16.49 कोटी
२. हेडावे ते सुंदरपट्टी ते सडावन रस्ता (TR-05, ODR-82) एकुण लांबी ५.०० की.मी. रक्कम 6.56 कोटी
३. रामा-15 ते देवळी देवगाव ते नगाव बु. रस्ता (LR-10, VR-12, 36) एकुण लांबी ३.६०० की.मी. रक्कम 5.83 कोटी
४. कंकराज ते भोकरवारी ते शेळावे बु. रस्ता (MRL-11, VR-66, 25,03) एकुण लांबी ७.०८० की.मी रक्कम 9.44 कोटी
५. सुमठाणे ते वडगाव ते बहादरपूर ते पुनगाव ते पारोळा रस्ता (TR-07, VR-05, 48, 40, 64) एकुण लांबी १४.२१० की.मी. रक्कम 20.67 कोटी

Protected Content