विचार वारसा फाउंडेशनतर्फे आरोग्य तपासणी शिबीर

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव शहरातील विचार वारसा फाउंडेशनतर्फे आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. शिबिरात २३० नागरिकांनी लाभ घेतला. आरोग्याची काळजी कशी घ्यावी याची माहिती डॉक्टरांनी दिली.

विचार वारसा फाउंडेशनतर्फे संस्थापक अध्यक्ष विशाल देशमुख यांच्या संकल्पनेतून हे शिबीर घेण्यात आले. शिबिरात शासकीय आयुर्वैदिक महाविद्यालयातील डॉ. शर्मिली सूर्यवंशी, डॉ.माधुरी नेहते, डॉ.शुभम पांढरे, डॉ. सोहेल पठाण यांनी नागरिकांची तपासणी करून त्यांना आरोग्य चांगले कसे ठेवावे याविषयी माहिती दिली. प्रसंगी धिरजकुमार राठोड, चेतन तंबोली, प्रदीप पारधी, दीपक घ्यार यांच्यासह परिचारक तुषार खरोडे यांनी सहकार्य केले.

प्रसंगी शिबिरासाठी अशोक पाटील,रमेश बहारे, रामाजी इंगळे, आशिष राजपूत, मयूर डांगे, अभिजीत राजपूत, अजय मांडोळे, संकेत मस्कर, गौरव डांगे, राहुल पाटील,अमोल ढाकणे, ऋषी राजपूत, मनीष चौधरी, आकाश तोमर, अक्षय गवई, अमोल पनाड, योगेश सनसे, अविनाश पाटील, प्रशांत सोनवणे, तेजस पाटील, पार्थ वाघ, मितेश वाघ, सोपान जाधव, चेतन राजपूत, हर्षल बराटे, किरण गरुड, निखिल शेलार आदींनी परिश्रम घेतले.

Protected Content