Home राजकीय रिपब्लिकन पक्षाच्या ‘या’ गटाने दिला शरद पवारांना पाठिंबा

रिपब्लिकन पक्षाच्या ‘या’ गटाने दिला शरद पवारांना पाठिंबा


पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून अनेक नेते शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाताना दिसत आहेत. आता अजित पवारांच्या पक्षाला साथ देणाऱ्या मित्र पक्षाने देखील साथ सोडून शरद पवारांना पाठिंबा दिल्याचा निर्णय घेतला आहे.

रिपब्लिकन पक्षाच्या खरात गटाने अजित पवारांचा साथ सोडण्याचा निर्णय घेतला असून ते लवकरच आता शरद पवारांच्या सोबत जाणार आहेत. महायुतीमध्ये दलित आणि मुस्लिमांच्या हिताचे रक्षण होत नसल्याने आपण अजित पवारांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचे सचिन खरात यांनी म्हणले आहे. तसेच शरद पवार व सुप्रिया सुळे यांच्याशी चर्चा केली असून पुढील निर्णय लवकरच घेणार असल्याचे सचिन खरात यांनी स्पष्ट केले आहे.


Protected Content

Play sound