मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | वंचित बहुजन आघाडीने विधानसभा निवडणूकीसाठी आपल्या १० उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. औरंगाबाद मध्यमधून मोहम्मद जावेद मोहम्मद इसहाक, गंगापूरमधून सय्यद गुलाब नबी सय्यद, कल्याण पश्चिममधून अयाज गुलजार मोलवी, हडपसरमधून ॲड. मोहम्मद अफरोज मुल्ला, माणमधून इम्तियाज जाफर नदाफ, शिरोळमधून आरिफ महामदअली पटेल, सांगलीमधून अल्लाउद्दीन हयातचंद काझी, मलकापूरमधून शहेजाद खान सलीम खान, बाळापूरमधून खतीब सय्यद नतीकुद्दीन, परभणीमधून सय्यद सामी सय्यद साहेबजान अशा १० मतदारसंघावर उमेदवार जाहीर केले आहे. वंचितने यावेळी जाहीर केलेले सर्व उमेदवार मुस्लिम समाजातील आहेत.
यापूर्वी वंचित बहुजन आघाडीने ११उमेदवारांची यादी जाहीर केली होती. यात औरंगाबाद पूर्वचा उमेदवार जाहीर केला होता. यानंतर आता मलकापूर, बाळापूर, परभणी, औरंगाबाद मध्य, कल्याण पश्चिम, हडपसर, माण, शिरोळ, सांगली या जागांचा समावेश आहे. त्यामुळे एकूण घोषित उमेदवारांची संख्या २१वर पोहोचली आहे.