आपला मृत्यु झाल्यास बीडीओ व विस्तार अधिकारी जबाबदार असेल: उपोषणकर्ते निळे निशानचे अध्यक्ष बाविस्कर

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शासनाकडून ठोस अशा स्वरूपात संपुर्ण मागण्या मान्य होणार नाही तो पर्यंत आपले उपोषण सुटणार नाही, दरम्यान उपोषणकर्ते यांची प्रकृती खालावली असुन या उपोषणाच्या काळात जर माझा मृत्यु झाल्यास यास गटविकास अधिकारी मंजुश्री गायकवाड व संपुर्ण पंचायत समितीची सुत्र फिरवणारे ग्रामपंचायत विस्तार अधिकारी किशोर सपकाळे हे जबाबदार राहतील अशी माहिती उपोषणकर्त आनंद काविस्कर यांनी यावल नगर परिषदचे प्रभारी मुख्यधिकारी समिर शेख आणि पोलीस निरिक्षक प्रदीय ठाकुर व पंचायत समितीच्या प्रशासना समोर दिली असल्याने एकच खळबळ उडाली आहे.

यावल पंचायत समिती यावलच्या अंतर्गत येणाऱ्या भालशिव ग्राम पंचायत अंतर्गतच्या टेंभीकुरण या आदिवासी दलित वर गेली अनेक वर्षापासुन नागरीकांच्या पिण्याचे पाणी, शालेय शिक्षण,रस्ता,मुलभुत सुविधा मिळत नसल्याकारणाने नागरीकांचे हाल होत असुन ,या गंभीर प्रश्नाकडे पंचायत समितीचे पुर्णपणे दुर्लक्ष होत असल्याने अखेर या दलित आदिवासी बांधवांना न्याय मिळून देण्यासाठी निळे निशान या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आनंद बाविस्कर यांनी यावल पंचायत समिती समोर मागिल चार दिवसापासुन आमरण उपोषण सुरू केले असून,दरम्यान उपोषणाच्या चौथ्या दिवशी गटविकास अधिकारी मंजुश्री गायकवाड व यावलचे प्रभारी मुख्यधिकारी समीर शेख यांनी तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्याशी चर्चा करून उपोषणकर्त्यांच्या काही मागण्या मान्य केल्या. मात्र जो पर्यंत संपुर्ण मागण्या मान्य होत नाही तो पर्यंत आपले उपोषण सुरूच राहील अशी भुमिका उपोषणकर्ते आनंद बाविस्कर यांनी घेतल्याने प्रशासनाची अधिक काळजी वाढली आहे. रात्रीच्या उपोषणाच्या ठिकाणी मोठया संख्येत आदिवासी व दलित समाजातील महिला भगिनी आपले कुटुंब व आपल्या लहान चिमकुल्या बाळांना घेवुन उपोषणाच्या ठिकाणी उपोषणाच्या ठीकाणी उपस्थित होत्या .

Protected Content