Home क्राईम सोन्याचे दागिने व ५० हजारासाठी विवाहितेला मारहाण करत छळ

सोन्याचे दागिने व ५० हजारासाठी विवाहितेला मारहाण करत छळ


वरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वरणगाव शहरातील मकरंद नगरातील माहेर असलेल्या विवाहितेला सासरी सोन्याचे दागिने व ५० हजार रुपयांची मागणी करत सासरी कल्याण येथे छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणे सोमवारी ७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, वरणगाव शहरातील मकरंद नगरातील माहेर असलेल्या दिपाली निलेश रडे वय-३३ यांचा विवाह ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथील निलेश विनायक रडे यांच्याशी रीतीरीवाजानुसार झालेला आहे. दरम्यान लग्नाच्या काही महिन्यानंतरच तिला पती निलेश रडे यांनी सोन्याचे दागिने व ५० हजार रुपयांची रोकडची मागणी केली. दरम्यान विवाहितेने माहेराहून पैसे आणले नाही, याचा राग आल्याने विवाहितेला शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच सासू, जेठ, जेठाणी, नणंद यांनी देखील पैशांसाठी त्रास दिला, दरम्यान हा प्रकार समोर आल्यानंतर विवाहिता ही माहेरी निघून आल्या. त्यानंतर त्यांनी सोमवारी ७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता वरणगाव पोलीसात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार पती निलेश विनायक रडे, सासू सुवर्णलता विनायक रडे, जेठ संदीप विनायक रडे, जेठाणी कांचन संदीप रडे, नणंद चित्रा देवेंद्र नारखेडे, माधुरी पंकज पाटील आणि नंदोईभाऊ पंकज प्रभाकर पाटील सर्व रा. कल्याण जि. ठाणे यांच्या विरोधात वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक फौजदार नागेंद्र तायडे करीत आहे.


Protected Content

Play sound