स्व संरक्षणाचे धडे घेऊन महिलांनी स्व संरक्षणात आत्मनिर्भर व्हावे : रोहिणी खडसे

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | स्त्री ही जीवसृष्टीच्या निर्मिती, संगोपनापासून ,अंतापर्यंत विविध भुमिका बजावत असते. आजची स्त्री हि दैनंदिन कामांपासून उद्योग व्यवसाय नोकरी घर संसार सक्षमपणे सांभाळत आहे परंतु अलीकडच्या काळात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे या घटनांमुळे घरा बाहेर पडणाऱ्या महिलांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे अनपेक्षित निर्माण होणारी परिस्थिती हाताळण्याकरिता व निर्माण होणाऱ्या प्रसंगाला निर्भीडपणे तोंड देऊन स्व संरक्षण करण्याची क्षमता निर्माण होण्याकरिता महिलांनी स्वसंरक्षणाचे धडे आत्मसात करणे अत्यावश्यक झाले आहे.

याच उद्देशाने प्रेरित होऊन राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांच्या संकल्पनेतून त्यांच्या संवेदना फाउंडेशन तर्फे बोदवड एज्युकेशन सोसायटी संचलित न. ह. राका. हायस्कूल आणि ज्यु.कॉलेज बोदवड येथे युवतींकरिता एक दिवसीय “स्वयंसिद्धा स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिर” आयोजित करण्यात आले होते. यावेळी युवती, विद्यार्थिनींनी उस्फुर्त पणे शिबिरात सहभागी होऊन स्व संरक्षणाचे धडे आत्मसात केले. शिबिरात सहभागी युवतींना राजेंद्र जंजाळ यांनी आपत्कालीन परिस्थितीत स्व संरक्षण कसे करावे याचे धडे दिले.प्रशिक्षणार्थी युवतींना शिबिरात सहभागा बद्दल प्रमाणपत्र देण्यात आले. याप्रसंगी मार्गदर्शन करताना रोहिणी खडसे म्हणाल्यापुर्वी स्त्रीचे कार्यक्षेत्र चुल आणि मुली पर्यंत मर्यादित होते

समाजाची सुद्धा तशीच भावना होती. परंतु आजच्या स्त्री ने सर्वांगिण क्षेत्रात भरारी घेतली आहे. शरद पवार यांनी स्त्रियांना आरक्षण, सैन्य पोलिस दलात नोकरी,महिलांसाठी योजना राबविणाऱ्या महिला बालविकास विभागाची स्थापना, बचत गट चळवळ उभारणी असे महिला हिताचे अनेक निर्णय घेतले. ते महिला सक्षमीकरणासाठी मैलाचा दगड ठरले. आजच्या महिला या शिक्षणातुन प्रगती साधुन कौटुंबिक जबाबदारी सांभाळून नोकरी उद्योग व्यवसाय करत आहेत. परंतु बदलत्या राजकीय व सामाजिक परिस्थितीत आज महिलांच्या सुरक्षितते बाबत काही गंभीर प्रश्न निर्माण होताना दिसत आहेत. समाजात महिला अत्याचाराच्या घटना वाढीस लागल्या आहेत अलीकडे घडलेल्या बदलापूर, उरण, शिळ फाटा, सिंदखेड राजा, बोपदेव घाट या महिला अत्याचाराच्या घटना मन विषण्ण करणाऱ्या माणुसकीला काळिमा फासणाऱ्या आहेत.

महिलांनी या सर्व क्षेत्रात सर्वांगिण प्रगती करून स्वयंसिद्धा, आत्मनिर्भर झाल्या आहेत मग महिलांनी स्व संरक्षणात सुध्दा मागे राहू नये आपण राजमाता जिजाऊ,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, माता रमाई, झाशीची राणी लक्ष्मीबाई,फातिमा शेख यांच्या वारसदार आहोत त्यांनी जसे स्व कर्तृत्वाने समाजातील वाईट प्रवृत्ती सोबत लढा दिला तसेच आपण सुद्धा स्वतःचे संरक्षण स्वतः करता येईल असे स्व संरक्षणाचे धडे आत्मसात करून आत्मनिर्भर होऊन आपल्यावर अत्याचार करणाऱ्या कु प्रवृत्तीच्या नराधमांना धडा शिकवावा असे आवाहन त्यांनी उपस्थितांशी संवाद साधताना केले.

भविष्यात मुक्ताईनगर मतदारसंघात सर्व शाळा महाविद्यालय आणि इतर ठिकाणी स्वयंसिद्धा प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्याचा मनोदय व्यक्त केला. यावेळी प्राचार्य पि एम पाटिल,सहाय्यक उपनिरीक्षक सुजित पाटिल,नगरसेवक भरत अप्पा पाटिल, सतिष पाटिल, कठोके मॅडम, नेमाडे मॅडम, जीवनसिंग राजपुत,संदीप पारधी,विकास शेळके उपस्थित होते

Protected Content