शिवसेना कार्यालयासमोरून तरूणाची दुचाकी लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील महानगरपालिकसमोरील शिवसेना कार्यालय समोरून तरूणाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना रविवारी ६ ऑक्टोबर रोजी दुपारी अडीच वाजता समोर आली आहे. याप्रकरणी सोमवारी ७ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

अधिक माहिती अशी की, दीपक राजू भोई वय-२४, रा. पिंप्राळा, जळगाव हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. चायनिज हातगाडी लावून तो आपला उदरनिर्वाह करत असतो. दरम्यान रविवारी ६ ऑक्टोबर रोजी दुपारी अडीच वाजता दीपक हा त्याची दुचाकी क्रमांक (एमएच १९ डीबी ११७४) ने जळगाव शहरातील महापालिकेच्या जवळ असलेल्या शिवसेना कार्यालयासमोर आला होता. दिपकने तिथेच दुचाकी पार्क करून लावली. दरम्यान ही दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. दुचाकी चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर दीपक भोई याने जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार सोमवारी ७ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल योगेश पाटील करीत आहे.

Protected Content