हरियाणामध्ये भाजप तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्याच्या मार्गावर

चंदीगढ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | हरियाणा विधानसभा निवडणूक निकालात मोठा उलटफेर पाहायला मिळत आहे. कालपर्यंत येथे काँग्रेसचा विजय होईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. एग्झिट पोल्सनीही काँग्रेसच्या पारड्यात स्पष्टपणे बहुमत पडेल, असे सांगितले होते. परंतू आता ट्रेंडनुसार भाजप तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार आहे. राज्यात असे करणारा हा पहिलाच पक्ष ठरणार आहे.

पक्षाला एकूण ९० जागांपैकी ४३ जागांवर आघाडी आहे. तर ७ जागा जिंकल्या आहेत. तर काँग्रेसने ३४ जागांवर आघाडी घेतली आहे. २१ जागा जिंकल्या आहेत. बहुमताचा आकडा ४६ असल्यामुळे भाजपाने बहुमतापेक्षाही अधिक जागांवर आघाडी घेतल्यानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सकाळपासून सुरू केलेला जल्लोष थांबविला आहे.
मुख्यमंत्री नायब सैनी आणि काँग्रेस नेते भूपेंद्र हुडा आपापल्या जागेवर आघाडीवर आहेत.

Protected Content