भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक २०२४ जाहीर

स्टॉकहोम-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | भौतिकशास्त्रामध्ये नोबेल पारितोषिक २०२४ जाहीर झाला आहे. यावेळी हा पारितोषिक जेफ्री ई. हिंटन आणि जॉन जे. होपफिल्ड यांना मिळाला आहे. त्यांना कृत्रिम न्युरॉन्सवर आधारित मशीन लर्निंशी संबंधित नवीन तंत्र विकसित केल्याबद्दल हा सन्मान त्यांना मिळाला आहे.

जेफ्री ई. हिंटन हे एआयचे गॉडफादर म्हणून ओळखले जातात. ते मूळ ब्रिटिश असून त्यांच्याकडे कॅनेडियन नागरिकत्व आहे. जॉन जे. होपफिल्ड हे अमेरिकन शास्त्रज्ञ आहे. स्वीडनची राजधानी स्टॉकहोम येथील रॉयल स्वीडिश ॲकॅडमी ऑफ सायन्सेसने हा पुरस्कार जाहीर केला आहे. दोन्ही विजेत्यांना 8.90 कोटी रुपयांची रक्कम मिळेल, जी त्यांच्यामध्ये समान प्रमाणात विभागली जाईल.

Protected Content