शारदा महिला मंडळाची वाटचाल कौतुकास्पद – डॉ. जागृती फेगडे

रावेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । येथील शारदा महिला मंडळाने विविध उपक्रम राबवत आजवर केलेली वाटचाल कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन डॉ. जागृती फेगडे यांनी केले.

शारदा महिला मंडळाला सोमवारी डॉ सौ जागृती फेगडे यांनी भेट दिली. पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. डॉ फेगडे यांच्या हस्ते सरस्वती मातेची पूजा, आरती करण्यात आली. उपस्थित महिला सदस्यांशी डॉ फेगडे यांनी संवाद साधला.शारदा महिला मंडळ अध्यक्ष..सौ मेघा ( सुवर्णा) जयंत भागवत, सौ अलका श्रावगी,सौ रंजना वाणी,सौ सुनीता विखे,सौ सुजाता देव,सौ माया काळे,सौ जयश्री वाणी, श्रीमती कांता बोरा, श्रीमती कल्पना वाणी,श्रीमती पुष्प मटकरी,सौ संगीता अकोले,सौ पल्लवी कुलकर्णी,सौ वीणा कुलकर्णी,सौ रेखा कुलकर्णी,सौ कांचन वाणी,सौ सुहासिनी अत्रे,सौ शोभा दलाल,सौ सिंधू गडे,सौ इंदु वाणी,सौ सोनाली नाईक इ उपस्थित होते.

याप्रसंगी डॉ. जागृती फेगडे यांनी महिलांचा संघटन असणे आजच्या या काळात खूप गरजेचे असल्याचे नमूद केले. या संघटनेची गरज ओळखून रावेर शहर आणि परिसरासाठी त्याकाळी एकत्र येऊन संस्था स्थापन केली. शारदा महिला मंडळ या नावाने संघटित होत महिलांचे प्रश्न मांडले. या संघटनेच्या माध्यमातुन बालवाडी व वाचनालय असे नवनविन उपक्रम या ठिकाणी सुरू केले असुन,दर एकादशीला महिला मिळून भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येते तसेच शारदीय नवरात्र उत्सवात शारदा मातेची पूजाअर्चा करून ९ दिवस विविध कार्यक्रम होतात.

Protected Content