आदिवासी विकास विभागाच्या यावल बीट स्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय यावल अंतर्गत यावल बीटस्तरीय वैयक्तिक क्रीडा स्पर्धा दिनांक 5 ऑक्टोबर 2024 रोजी व्ही.एस. नाईक महाविद्यालय रावेर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. प्रकल्पाधिकारी अरुण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाल्या

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सहाय्यक प्रकल्प अधिकारी राजेंद्र लवणे यांनी भूषविले. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी तथा यावल बीट प्रमुख मिलिंद पाईकराव उपस्थित होते.

या क्रीडा स्पर्धांच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक मनिष तडवी,साबळे सर, राणे सर, ठाकरे सर, महानोर सर आणि यावल बीट मधील सर्व शासकीय तसेच अनुदानित आश्रम शाळांचे मुख्याध्यापक, क्रीडाशिक्षक, संघ व्यवस्थापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले. पिंप्री मोहगण शाळेचे मुख्याध्यापक जितेंद्र पाटील यांनी भोजनाची व्यवस्था केली तर मोहमांडली शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र कुमावत यांनी इतर आवश्यक सुविधा पुरविल्या. व्ही.एस. नाईक महाविद्यालयाने मैदान उपलब्ध करून दिले.सदर स्पर्धा शांततेत आणि मोठ्या उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेमध्ये प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त विद्यार्थी पुढे होणाऱ्या प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.

Protected Content