रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राज्यस्तरीय परिषदेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री गैरहजर, पणनमंत्र्यांचा बाजार समित्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष दिनांक ३ ऑक्टोबर २०२४ रोजी ग.दि. माडगूळकर नाट्यगृह, निगडी, चिंचवड, पुणे येथे महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ व महाराष्ट्र राज्य बाजार समिती, सहकारी संघ मर्यादित पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत राज्याचे मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री आणि पणनमंत्री उपस्थित राहणार होते.
मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीमुळे परिषदेला उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र, राज्याचे पणनमंत्री अब्दुल सत्तार परिषदेसाठी उपस्थित राहिले. त्यांनी बाजार समित्यांच्या प्रतिनिधींचे अडचणी, प्रश्न न ऐकता आणि त्यावर कोणतेही उपाय न मांडता परिषदेच्या ठिकाणावरून लगेचच निघून गेले. या घटनेमुळे बाजार समित्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष झाल्याचे जाणवले आणि उपस्थित प्रतिनिधींनी पणनमंत्र्यांचा जाहीर निषेध केला. सोमवार दिनांक ७ ऑक्टोबर २०२४ रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप करण्यात आला, ज्यात बाजार समित्यांचे सभापती, उपसभापती व सर्व कर्मचारी सहभागी झाले होते.