जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील जुने जळगावातील होले वाडासह परिसरात अपुर्ण पाणीपुरवठा आणि रस्त्यावरील खंब्यांचे लाईट सुरू करण्याच्या मागणीसाठी स्थानिक रहिवाशी यांनी जळगाव महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर मुळे यांना सोमवार ७ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता निवेदन देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जुने जळगावातील होले वाडा आणि परिसरात गेल्या चार महिन्यांपासून कमी दाबामुळे पाणीपुरवठा अपुर्ण होत आहे. सुरूवातीचे काही घरांना पाणीपुरवठा होतो तर होलेवाडा परिसरातील रहिवाशांना पाणी मिळतनच नाही. वॉलमन यांना संदर्भात विचारणा केली असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळतात. शिवाय यापुर्वी महापालिकेकडे यासंदर्भात तक्रारही करण्यात आली होती. परंतू महापालिकेला नियमित पाणीपट्टी देवून देखील महापालिका प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली गेली नाही. त्यामुळे या परिसरातील पिण्याची पाईपलाईन चेक करून नियमितपणे मुबलक पाणी पुरवठा करावा. तर याच परिसरात गेल्या चार महिन्यांपासून रस्त्यांवरील लाईट बंद आहे. रात्रीच्या सुमारास पुर्णपणे अंधार असल्याने वृध्दांसह महिलांना ये जा करण्यासाठी मोठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच लाईट बंद असल्याने चोरी होण्याची दाट शक्यता असून याची जबाबदारी कोण स्विकारणार आहे. तरी तातडीने जुने जळगावातील होलेवाडा परिसरातील नागरीकांच्या समस्या तातडीने सोडविण्यात याव्यात अशी मागणी निवेदनात नमूद केले आहे.