जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चोरीच्या ६ दुचाकींसह दोन चोरट्यांना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी ६ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता कारवाई करत पारोळा शहरातून अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीच्या सहा दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे, अशी माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार कळविले आहे.
या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, पारोळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरी केलेली दुचाकी ही पारोळा शहरात राहणारे रवींद्र उर्फ राहुल पाटील व दीपक ज्ञानेश्वर पाटील हे घेऊन फिरत असल्याची गोपनीय माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. पथकातील पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, दत्तात्रय पोटे, सहाय्यक फौजदार विजयसिंह पाटील, सुधाकर अंभोरे, महेश महाजन, अक्रम शेख, लक्ष्मण पाटील, राहुल पाटील, जितेंद्र पाटील, भूषण पाटील, रणजीत जाधव, दीपक चौधरी यांनी कारवाई करत संशयित आरोपी रवींद्र उर्फ राहुल पाटील आणि दीपक ज्ञानेश्वर पाटील दोन्ही रा. पारोळा या दोघांना पारोळा शहरातून अटक केली. त्यांच्याकडून चोरीच्या ६ दुचाकी जप्त केली आहे. त्यांच्यावर संबंधितज्याप्रकारे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी दिली आहे.