मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | नवरात्र उत्सवात सर्वत्र आदिशक्ती म्हणजे शक्तीचे स्वरूप असलेल्या दुर्गा मातेची उपासना केली जाते म्हणून नवरात्रीला शक्तिदेवतेचा उत्सव म्हटले जाते नवरात्रात शक्तीची निरनिराळी रूपे आपल्याकडे परंपरेने पुजली जातात. दुर्गा देवीच्या उपासना, आराधना, नामस्मरण, जप केले जातात. नवरात्रात केलेले दुर्गा देवीचे पूजन सर्वश्रेष्ठ मानले गेले आहे. नवरात्राच्या संपूर्ण नऊ दिवसात नवदुर्गेच्या नऊ रुपांचे पूजन केले जाते. अनेक ठिकाणी आपापाले कुळाचार, कुळधर्म, प्रथा, पद्धती, परंपरा यांनुसार विशेष व्रताचरण केले जाते.देवीच्या विविध श्लोक, मंत्र, पाठ यांमध्ये श्रीदुर्गा सप्तशती पाठाला विशेष शुभदायक मानले गेले आहे.
राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष ॲड रोहिणी खडसे यांच्या संवेदना फाउंडेशनच्या सौजन्याने नवरात्री आणि आदिशक्ती मुक्ताईच्या जन्मोत्सव सोहळ्याचे औचित्य साधुन श्री. स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरीच्या अब्जचंडी श्री दुर्गा सप्तशती पाठ पारायण सेवेत संकल्पित होऊन श्री. स्वामी समर्थ सेवामार्गाचे अर्ध्वयू गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या आशीर्वादाने श्री. संत गजानन महाराज मंदिर मुक्ताईनगर येथे श्री दुर्गा सप्तशती पाठ परायणाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी तिनशे महिला भगिनींनी पारायण सोहळ्यात सहभागी होऊन दुर्गा सप्तशती पाठाचे पारायण केले.दुर्गा सप्तशती पाठाच्या मंत्रोपचाराच्या पठणाने परीसरातील वातावरणात चैतन्य निर्माण झाले होते सहभागी झालेल्या महिलांना ॲड. रोहिणी खडसे यांच्या तर्फे श्री दुर्गा सप्तशती पाठ ग्रंथाचे वितरण करण्यात आले
यावेळी रोहिणी खडसे म्हणाल्या ‘आपल्या कडे शक्तीला आणि शक्ती उपासनेला अनन्यसाधारण महत्व आहे.आपल्या जीवनात येणाऱ्या संकटांना, दुखांना दूर करण्यासाठी शक्तीची उपासना हा सर्वोत्तम मार्ग सांगितल्या जातो. आणि नवरात्रात देवीचा शक्ती स्वरुपात सर्वत्र मुक्त संचार असल्याचे मानले जाते म्हणुन यावेळी देवीची म्हणजे शक्तीची उपासना केली जाते दुर्गा सप्तशती पाठ म्हणजे देवीच्या शक्ती स्वरुपाची केलेली उपासनाच होय आपले धर्मग्रंथ हेच आपल्या आध्यात्मिक उन्नतीचे साधन आहे आणि असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही, त्यातून आपल्याला शांती, सुसंवाद आणि आत्मज्ञान प्राप्त होण्यास मदत होते. यातून जीवनातील नकारात्मक शक्ती दुर होऊन आणि आयुष्यातील अडथळ्यांसोबत लढण्यासाठी शक्ती आणि ऊर्जा प्राप्त होते. आज दुर्गा सप्तशती पाठाचे पठण करून आदिशक्ती दुर्गा माता आणि मुक्ताईला संपूर्ण नारीशक्तीला अन्याया, अत्याचाराविरोधात लढण्याचे बळ दे आणि सर्वांना सुख समृद्धी निरोगी दीर्घायुष्य मिळू दे अशी प्रार्थना केल्याचे ॲड रोहिणी खडसे यांनी सांगीतले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिवाजी वंजारी, व्हि डी पाटिल, प्राजक्ता चौधरी, जितेंद्र पाटील यांनी परिश्रम घेतले