जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील देव्हारी गावात राहणाऱ्या तरूणाला किरकोळ कारणावरून लोखंडी विळ्याने वार करून गंभीर दुखापत केल्याची घटना शनिवारी ५ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेचार वाजता घडली आहे. याप्रकरणी रात्री १०.३० वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गोपाल भगवान पाटील वय ४० रा. देव्हारी ता.जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शनिवारी ५ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास घरी असतांना त्यांच्या घराकडे भावेश श्रीराम बिऱ्हाडे हा पाहत होता. त्यावेळी त्याला गोपाल पाटील याने घराकडे न पाहण्याबाबत समजावून सांगितले. या रागातून गोपाल पाटील याला संशयित आरोपी भावेश श्रीराम बिऱ्हाडे, महेश श्रीराम बिऱ्हाडे, उत्तम शेनु बिऱ्हाउे तिघे राहणार देव्हारी ता. जळगाव यांनी गोपाल पाटील यांना शिवीगाळ करून लोखंडी विळ्याने वार करून दुखापत केली. ही घटना घडल्यानंतर गोपाल पाटील यांनी नशिराबाद पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी भावेश श्रीराम बिऱ्हाडे, महेश श्रीराम बिऱ्हाडे, उत्तम शेनु बिऱ्हाउे तिघे राहणार देव्हारी ता. जळगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रविंद्र तायडे हे करीत आहे.