वरणगाव महाविद्यालयात सर्पमित्र यांचे व्याख्यान

वरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वरणगाव येथील महाविद्यालयाच्या डॉ.सी.व्ही.रमन सभागृहात ४ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता अवनी बहुउद्देशीय संस्थाच्या वतीने आयोजित सर्पमित्र व्याख्यानामध्ये विविध विषारी व बिनविषारी जातीच्या सर्व प्रवर्गातील सर्पांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

अत्यंत महत्वाची जीवनात उपयोगी येणारी माहिती सादर करण्यात आली. साप चावल्यानंतर काय करावे व काय करू नये, याबाबतचे सविस्तर मार्गदर्शन आणि जनजागरूकता या व्याख्यानातून करण्यात आली. या व्याख्यानात अवनी बहुउद्देशीय संस्था वरणगाव यांच्यावतीने दीपक वाघ,सचिन कदम,शुभम फालक,मंगेश कुंभार,बबलू कोळी,आदेश भैसे,दीपक नाटेकर आणि धनराज सपकाळे या सर्व सर्पमित्रांनी विस्तॄत माहिती श्रोत्यांसमोर सादर केली.

याप्रसंगी उपप्राचार्य डॉ.अनिल हरी शिंदे, डॉ.बी.जी.देशमुख, डॉ.अशोक चित्ते, डॉ.नितीन इंगळे, प्रा.ए.एम.कलवले आणि नाहाटा महाविद्यालय भुसावळ येथील डॉ.एस.एस.कोलते, प्रा. मनीषा इंगळे, प्रा.रजनी इंगळे, प्रा.वाय.डी.पाटील, प्रा.चेतन पाटील, संध्या निकम व विद्यार्थी यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्र संचलन प्रा.हेमराज मेतकर यांनी केले.

Protected Content