बीडीओ यांना सेवेतून बडतर्फे करा; निळे निशान संघटनेच्या अध्यक्षांचे उपोषण

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल तालुक्यातील अनु . जाती/जमातीच्या लोकांचा जाणिवपुर्वक मानसिक छळ करून त्यांना त्यांच्या हक्का पासून वंचित ठेवणाऱ्या यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांना शासकीय सेवेतून बडतर्फ करून अनु . जाती/जमातीच्या लोकांना न्याय मिळवून देण्याकरिता दि . ०५ ऑक्टोबर २०२४ पासून पंचायत समिती कार्यालया समोर निळे निशाण संघटनेच्या वतीने संघटनेचे संस्थापक / अध्यक्ष यांचे आमरण उपोषणास प्रारंभ झाले असून आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे. यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांनी जाणिवपुर्वक तालुक्यातील काही गावाच्या अनु . जाती/जमातीच्या लोकांना जातीय व्देष भावनेतून त्यांच्या मूलभूत हक्कांपासून वंचित ठेवण्याचे काम गटविकास अधिकाऱ्यांने केले असल्याचा निळेनिशान संघटनेचा आरोप आहे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या ठिकाणी कोणीही शनिवारची सुट्टी असल्यामुळे फिरकूनही पाहिले नाही.

त्याच्या निषेर्धात निळे निशाण संघटनेच्या वतीने दि . ०३ ऑक्टोबर २०२४ पासून संघटनेचे संस्थाकप / अध्यक्ष यांच्या उपस्थितीत अनु . जाती/जमातीच्या शेकडो महिलांनी पंचायत समिती कार्यालया समोर रात्रंदिवस ठिय्या आंदोलन सुरू केले.  दि . ०४ ऑक्टोंबर २०२४ रोजी यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांच्यासह अनेक अधिकारी यांनी आंदोलनास्थळी भेट देऊन चर्चा करण्यांचा प्रयत्न केला परंतु संघटनेचे संस्थापक / अध्यक्ष आनंदभाऊ बाविस्कर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नामुळे अधिकारी निरुत्तर होऊन अधिकाऱ्यांनी उडवाउडवीचे उत्तर दिल्यामुळे होणारी चर्चा संपुष्टात आली. त्याअनुषगांने अनुसुचित जाती/जमातीच्या जीवघेण्या समस्याकडे शासन प्रशासनाचे लक्ष केंद्रित होईल व अनुसुचित जाती/जमातीच्या लोकांचा जाणिवपूर्वक मानसिक छळ करणाऱ्या जातियवादी मानसिकतेच्या गटविकास अधिकारी व इतर संबंधीत व्यक्तीवर शासन प्रशासनाने शासकिय सेवेतून बडतर्फ करण्याची कारवाई करून अनुसुचित जाती/जमातीचे लोकांना न्याय द्यावा यासाठी ठिय्या आंदोलनांचे रूपातंर आमरण उपोषणात करण्यात आले. त्या अनुषगांने संघटनेचे संस्थापक/अध्यक्ष आनंद बाविस्कर यांनी दि . ०५ ऑक्टोंबर २०२४ पासून स्वतः आमरण उपोषणास बसण्याचा निर्णय घेतला तसेच लवकरच अनु . जाती/जमातीला न्याय न मिळाल्यास संघटनेच्या महिला आघाडीच्या वतीने लोकशाही मार्गाने तिव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल अशी माहिती संघटनेचे यावल तालुका अध्यक्ष विलास तायडे व यावल तालुका महिला आघाडी अध्यक्षा मनिषा बागुल यांनी दिली .

Protected Content