“उमेद” बचत गटातील विविध मागण्यांकडे शासन दरबारी प्रयत्न करणार : अमोल जावळे

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महाराष्ट्र सरकारच्या ग्रामीण विकास आणि महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण असलेल्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान “उमेद” योजनेत मोठ्या संख्येने प्रेरिका व विविध प्रकारच्या समुदाय संसाधन व्यक्ती सेवा देत आहेत आणि त्यांची आज बैठक पार पडली. या अभियानात जवळपास ७ लाख महिला, ५२००० समुदाय संसाधन व्यक्ती सेवारत आहेत. महाराष्ट्रातील जवळपास ८४ लाख परिवारांसोबत या सर्व महिला जोडल्या गेल्या आहेत.

आपले महायुतीचे सरकार हे खऱ्या अर्थाने महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी, त्यांना आत्मनिर्भर बनविण्या साठी समर्पित आहे.महिला सक्षमीकरणा साठी अनेक महत्वाकांक्षी योजना आणि स्तुत्य निर्णय आपल्या सरकारने घेतले आहेत. राष्ट्राच्या विकासासाठी जनसंख्येतील ५०% भागीदारी असलेल्या मातृशक्तीचा विकास केंद्रस्थानी मानून आपण निर्णय घेतले आहेत. आज उमेद अभियानात सेवारत असलेल्या माता भगिनींच्या या कामबंद आंदोलनात त्यांनी खालील प्रमाणे मागण्या केल्या आहेत.

१) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) साठी एक स्वतंत्र विभाग तयार करण्यात यावा.२)समुदाय संसाधन व्यक्ती म्हणून सेवारत असलेल्या ताईंना “ग्रामविकास सेवक म्हणून पद बहाल करण्यात यावे. ३) उमेद मध्ये कंत्राटी कामगार म्हणून काम करणाऱ्या कामगारांना कायम शासन सेवेत समाविष्ट करण्यात यावे. ४)महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) हे ग्रामीण विकास आणि मातृशक्ती च्या सक्षमीकरणात अत्यंत महत्वाची भूमिका बजावत आहे त्यामुळे हे अभियान अविरत चालू ठेवण्यात यावे. तरी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) मध्ये सेवारत असणाऱ्या मातृशक्तीच्या मागण्यांवर सकारात्मक विचार केला जावा, हीच अपेक्षा आहे.

महिलांचा विकास आणि आत्म निर्भरता हे आपल्या समाजाच्या विकासासाठी अत्यंत आवश्यक आहे. शासनाच्या वतीने या मागण्यांचा विचार करून योग्य निर्णय घेण्यात येतील, अशी आशा व्यक्त करीत भारतीय जनता पक्षाच्या पुर्व विभागाचे जिल्हा अध्यक्ष अमोल जावळे यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री ना.गिरीष महाजन यांच्याकडे उमेद बचत गटाच्या महिलांच्या मागण्यांकडे लक्ष वेधले. यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात झालेल्या उमेद या बचत गटातील आंदोलना प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राकेश वसंत फेगडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती नारायण चौधरी, भारतीय जनता पक्षाच्या वैद्यकीय आघाडीचे जिल्हा सरचिटणीस डॉ. कुंदन फेगडे यांच्यासह आदि मान्यवर उपस्थित होते.

Protected Content