कर्तव्यावर मृत्यू झालेल्या गाळण येथील जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दिल्ली येथे कर्तव्यावर असतांना सी.आर.पी.एफ. जवानाचा अल्पशा आजाराने निधन झाल्याची घटना बुधवारी २ ऑक्टोबररोजी सायंकाळी ८ वाजेच्या सुमारास उपचारा दरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. जवानावर तालुक्यातील गाळण येथे राहत्या गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

पाचोरा तालुक्यातील गाळण येथील रहिवासी दिपक डिंगबर शिंपी (वय – ३७ वर्ष) यांना लहानपणापासूनच देशसेवा करण्याची आवड होती. आणि आपली जिद्द पुर्ण करत दिपक शिंपी हे सन – २०११ मध्ये सी. आर. पी. एफ. मध्ये भरती झाले. देशातील सी. आर. पी. एफ. युनिटमध्ये त्यांनी यशस्वी कामगिरी बजावली. गेल्या काही वर्षांपासून त्यांची दिल्ली येथे पोस्टिंग होती. दरम्यान दिपक शिंपी यांना काविळ या आजाराने ग्रासले. त्यांचेवर दिल्ली येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र २ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ८ वाजेच्या सुमारास उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. घटनेची माहिती गाळण या गावात मिळताच गावात शोककळा पसरली. दिपक शिंपी यांचा मृतदेह ४ आॅक्टोबर रोजी सकाळी ११:३० वाजता विमानाने जळगाव येथे व जळगाव येथुन वाहनाने गाळण येथे आणण्यात आले. तेथे दुपारी १:३० वाजता शासकीय इतमामात दिपक शिंपी यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. दिपक शिंपी यांचे पाश्चात्य वृद्ध आई, वडिल, एक मुलगा (६ वर्ष), एक मुलगी (९ वर्ष) असा परिवार आहे.
**

Protected Content