यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल नगरपरिषदेचे मुख्याधिकारी हे पद गेल्या ४ वर्षापासून रिक्त असल्याने प्रशासनाच्या कारभारावर कुणाचे ही वचक नसल्याने नागरीकांचे हाल होत असुन, शहरातील नागरिकांच्या समस्यांचे निराकरण होत नसल्याने नगरपरिषद प्रशासनाच्या कारभाराबाबत शहरवासीयांमध्ये कमालीची नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे यावल नगरपरिषेदला कायमस्वरूपी मुख्याधिकारी देण्यात यावा अशी मागणीचे निवेदन सर्वपक्षियच्या वतीने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना देण्यात आले.
यावेळी सर्वपक्षीय शिष्ठ मंडळात शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा उपसंघटक नितिन सोनार,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जनहित विभागाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष चेतन अढळकर, कॉंग्रेसचे भगतसिंग पाटील, कदीर खान, अनिल जंजाळे, प्रहार जनशक्ती पक्षाचे अलीम शेख यांचा समावेश होता. याप्रसंगी या संदर्भात जिल्हाधिकारी यांनी तात्काळ निर्णय घेण्याचे आश्वासन शिष्टमंडळास दिले आहे.