यावल-लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगेत असलेल्या खान्देश वासीयांचे कुलदैवत असलेल्या श्रीमनुदेवी मंदीरावर घटस्थापनाच्या निमित्ताने यात्रा भरत असते या निमित्ताने दर्शनासाठी जाणाऱ्या परिसरातील हजारो दर्शनार्थी भाविकांसाठी एसटी बस सोडण्यात येणार असल्याची माहिती देत भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन यावल एसटी बसचे आगार प्रमुख दिलीप महाजन यांनी केले आहे.
यावल तालुक्यात ३ ऑक्टोंबर रोजी २०२४ ऑक्टोबर रोजी घटस्थापना झालेली असून नवरात्रोत्सवास सुरुवात झालेली आहे. सालाबाद प्रमाणे सातपुडा निवासिनी श्री.मनुमातेच्या दर्शनासाठी लाखो भाविक नवरात्रोत्सव दरम्यान श्री क्षेत्र मनुदेवी येथे येत असतात. त्यानिमित्ताने रा. प. यावल आगारातर्फे दि. ०६/१०/२०२४ ते ११/१०/२०२४ या कालावधी दरम्यान मानापुरी पार्किंग स्थळ ते मनुदेवी मंदिर या मार्गावर दररोज सुमारे २० ते २५ जादा बसेसचे नियोजन करण्यात आलेले आहे. सदर कालावधी दरम्यान खाजगी वाहनांना मानापुरीच्या पुढे जाण्यास प्रतिबंध करण्यात येणार असून फक्त राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस या मनु देवीच्या मंदिरापर्यंत जाणार आहेत. भाविकांनी एस. टी. बसचा लाभ घ्यावा असे आवाहन राज्य परिवहन महामंडळातर्फे करण्यात आलेले आहे जळगाव विभागाचे विभाग नियंत्रक भगवान जगनोर, विभागीय वाहतूक अधिकारी दिलीप बंजारा,यंत्रअभियंता किशोर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यावलचे आगार व्यवस्थापक दिलीप महाजन, सहाय्यक वाहतूक अधीक्षक जगदिश सोळंके, सहाय्यक. कार्यशाळा अधीक्षक तेजस शुक्ल, वाहतूक निरीक्षक कुंदन वानखेडे व सिद्धार्थ सोनवणे परिश्रम घेत आहेत व नियोजन करीत आहेत.