आश्रमशाळेत दंतरोग चिकित्सा व महिती शिबिर उत्साहात

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मृती संस्था संचलित अनुदानित आश्रम शाळा येथे दंतरोग तज्ञ डॉ मयूर जैन व टीम कडून दंतरोग चिकित्सा व माहिती शिबिर घेण्यात आली. शाळेतील सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनींनी जाणून घेतली तंबाखू गुटखा सिगरेटमुळे होणाऱ्या दुष्परिणामाची माहिती व आयुष्यभर हे व्यसन न करण्याची घेतली प्रतिज्ञा देण्यात आली.

आज क्रांतिकारी खाज्याजी नाईक संस्था संचलित अनुदानित आश्रम शाळा येथे धरणगाव येथील दंतरोग तज्ञ डॉ श्री मयूर जैन व टीम यांचे कडून दंतरोग चिकित्सा व माहिती शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यात प्रामुख्याने विद्यार्थ्यांना दाताची निगा कशी राखावी, तसेच व्यसनमुक्ती तंबाखू, गुटखा, सिगरेट, मुक्ती मार्गदर्शन करण्यात आले व सर्व विद्यार्थ्यांनी तंबाखू, गुटखा, सिगरेट या व्यसनांच्या दुष्परिणांची जाणीव करून देत सर्वांकडून हे व्यसन करणार नाही अशी प्रतिज्ञा घेण्यात आली. तसेच डॉ.मयूर जैन यांनी ज्या विद्यार्थी, विद्यार्थिनींना दातांविषयी समस्या होत्या. अशा २०-२५ विद्यार्थी, विद्यार्थिनींची तपासणी करण्यात आली.

डॉक्टरांनी दर महिन्याला असे शिबिर घेऊन सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना माहिती व तपासणी करण्यात येईल असे आश्वासन दिले व सर्व विद्यार्थ्यांना टूथ पेस्ट व ब्रश भेट देऊन दातांची निगा कशी राखावी याविषयी प्रात्यक्षिक करून दाखवले. प्रास्ताविक एस.गायकवाड यांनी केले संस्थेच्या वतीने डॉ.मयूर जैन यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शाळेच्या सर्व शिक्षक स्टाफ व प्रतिक जैन हे उपस्थित होते. क्रांतिकारी खाज्याजी नाईक संस्थेचे सचिव विलास महाजन व व्यवस्थापक अमोल जाधव यांनी आभार मानले.

Protected Content