कृषीमित्र माजी खा. हरिभाऊ जावळे जयंतीनिमित्त अभिवादन

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल तालुक्यातील भालोद येथे माजी खासदार व माजी आमदार कृषीमित्र व माती, माय, माणुस या त्रिसुत्रीवर आधारीत विचारसरणीतुन समाजाची सेवा अशा दुरदृष्टीने आणि जाजवल्य विचारांनी लोकहीताचे काम करणारे तथा समाजसेवा ,राजकारण आणि लोकहित यांचा समन्वय असलेल्या स्व.हरिभाऊ माधव जावळे यांच्या जीवनकार्याचे स्मरण म्हणुन ७१ व्या जयंती निमित्ताने अभिवादन व आदरांजलीचा कार्यक्रम पार पडला.

यावल तालुक्यातील भालोद येथे राहणारे व माजी खासदार व माजी आमदार स्व.हरिभाऊ माधव जावळे यांची ७१वी जयंती निमित्ताने अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला. स्व.हरिभाऊ माधव माधव जावळे यांच्या निवासस्थानी विविध मान्यवरां च्या उपस्थितीत संपन्न झालेल्या कार्यक्रमास स्व.हरिभाऊ यांचे चिरंजिव व भारतीय जनता पक्षाच्या पुर्व विभागाचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांच्यासह कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा भाजपा किसान मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष नारायण चौधरी, यावल कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती राकेश वसंत फेगडे,यावल पंचायत समितीचे माजी उपसभापती दिपक अण्णा पाटील ,सुभाष सोनवणे, प्रदिप कोळी, नितीन व्यंकट चौधरी अतुल भालेराव माजी जिल्हा परिषद सदस्या सविता भालेराव, भारतीय जनता पक्षाचे यावल तालुका अध्यक्ष उमेश फेगडे , नितीन चौधरी, गणेश नेहते, फैजपुरचे माजी नगराध्यक्ष निलेश राणे, कृउबाचे संचालक उज्जैनसिंग राजपूत भारतीय जनता पक्षाचे यावल तालुका सरचिटणीस विलास चौधरी व इतर सर्व कार्यकर्त व मान्यवर ग्रामस्थांनी उपस्थित राहुन स्व.हरिभाऊ जावळे यांच्या प्रतिमेचे पुजन करून अभिवादन करीत आदरांजली वाहीली.

Protected Content