विजयादशमी निमित्ताने होणाऱ्या रावण दहन कार्यक्रमाची सर्वपक्षीय समिती गठीत

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल शहरात सालाबादप्रमाणे महर्षी व्यास यांच्या मंदिरा समोरील हरिता सरीता नदीच्या पात्रात होणाऱ्या दि. १२ ऑक्टोबर शनिवार रोजी विजयादशमीच्या निमित्त श्री छत्रपती शिवाजी महाराज मित्र मंडळा यावलच्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थित होत असलेल्या रावण दहन कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सर्वपक्षीय समिती स्थापन करण्यात आली आहे.

या समितीच्या अध्यक्षपदी माजी उपनगराध्यक्ष व राष्ट्रवादीचे पक्षाच्या शरदचंद्र पवार गटाचे तालुका यावल अध्यक्ष प्रा मुकेश येवले यांची निवड करण्यात आली असुन, उपाध्यक्षपदी यावल खरेदी विक्री सहकारी संघाचे माजी चेअरमन अमोल भिरुड.डॉ हेमंत येवले, कार्याध्यक्ष अमोल दुसाने, कोषाध्यक्ष विवेक देवरे यांची निवड करण्यात आली आहे. समितीच्या कार्यकारणी सदस्य उमेश फेगडे,शरद कोळी, तुकाराम बारी, अभिमन्यु चौधरी, चेतन आढळकर, संतोष कवडीवाले, अरुण लोखंडे, सुनील गावडे, कामराज घारू, यशवंत जासुद, नितीन पाटील, दीपक जोशी, योगेश चौधरी, राजेश श्रावगी अशी सर्वपक्षीय व सर्व सामाजिक कार्यकारणी घटित करण्यात आली.

Protected Content