धरणगावात तरूणाचा मृतदेह आढळला

धरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | धरणगाव शहरातील श्री स्वामी समर्थ मंदीराच्या पाठीमागे एका ३४ वर्षीय तरूणाचा मृतदेह आढळून आल्याची घटना मंगळवारी १ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. याप्रकरणी सायंकाळी ५ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. नितीन सखाराम नेवारे (वय-३४, रा.वडगाव गाडवे ता.धारवा जि. यवतमाळ) असे मत झालेल्या तरूणाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, यवतमाळ जिल्ह्यातील वडगाव गाडवे येथील रहिवाशी असलेला नितीन नेवारे हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. धरणगाव शहरातील श्री स्वामी समर्थ मंदीराच्या पाठीमागील बाजूस मंगळवारी १ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास नितीन नेवारे याचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर धरणगाव पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. खिश्यातील कागदपत्राच्या आधारे त्यांची ओळख पटली. पंचनामा करून मृतदेह धरणगाव ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबत धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोहेकॉ चंद्रकांत पाटील हे करीत आहे.

Protected Content