पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | नाभिक समाजासाठी एक ज्वलंत दिप तेवत ठेवणारे एक थोर समाजसुधारक संत श्री सेना महाराज यांचे नाव ऐकल्यावर आजही समाजाच्या परिवर्तनासाठी पोटात कालवाकालव होते. उभ आयुष्य नाभिक समाजासाठी अर्पण करून त्यांच्या अभंगवाणीतुन समाजात परिवर्तनाची ज्योत निर्माण केली होती.आमदार चिमणराव पाटील व दि जळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील यांच्या संकल्पनेतुन आपल्या दैनंदिन व्यवसायावर आपला उदरनिर्वाह भागविणाऱ्या नाभिक समाज बांधवांना सलुन किट वितरणाचा कार्यक्रमाचे आयोजन करून पारोळा, एरंडोल व भडगांव तालुक्यातील नाभिक समाज एकत्र यावा या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
आज पारोळा येथे आमदार चिमणराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व जळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत नाभिक समाज बांधवांना सलुन वितरण सोहळा पार पडला. सर्वप्रथम दिपप्रज्वलन, राजेछत्रपती शिवाजी महाराज, नाभिक समाजाचे आराध्यदैवत संत सेना महाराज, हिंदुहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना माल्यार्पण अर्पण करून वंदन करण्यात आले.आमचा नाभिक समाजाची आजवर कुणीही दखल घेतली नव्हती, आज आमचा समाजाची दखल घेवुन आमचा सन्मान केल्याबद्दल आमदार चिमणराव पाटील व अमोल पाटील यांचे आभार मानत एरंडोल विधानसभा मतदारसंघा विविध गावांतील नाभिक समाज बांधवांतर्फे सत्कार करण्यात आला. यासमयी या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन एरंडोल विधानसभा मतदारसंघाचे मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेचे अध्यक्ष कुणाल महाजन यांनी केले, प्रास्ताविक मा.तालुकाप्रमुख बबलु पाटील यांनी केले. पारोळा नाभिक समाज मंडळाचे अध्यक्ष दिनेशभाऊ अहिरराव, उत्राण येथील प्रकाशभाऊ कुवर, भडगांव येथील संजय पवार, पारोळा सिडबॉल कॕम्पेनचे प्रमुख राहुल निकम, फरकांडे येथील राजेंद्र ठाकरे सर यांनी आपल्या मनोगतातुन आमदार चिमणराव पाटील व अमोल पाटील यांचे आभार मानत, आपले समाजातील कार्य, व्यवसाय यावर मार्गदर्शन केले.
यावेळी फरकांडे येथील राजेंद्र ठाकरे सर यांनी आमदार चिमणराव पाटील व अमोल पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचा सत्कार करत शिवसेनेत स्वागत करण्यात आले. तद्नंतर धरणगांव कृषि उत्पन्न बाजार समितीचे मा.सभापती शालिकभाऊ गायकवाड, पारोळा नगरपरिषदेचे मा.नगराध्यक्ष दयाराम पाटील, जि.प.मा.उपाध्यक्ष तथा एरंडोल विधानसभा महायुतीचे समन्वयक ज्ञानेश्वरनाना आमले, शेतकी संघाचे संचालक चतुरभाऊसाहेब पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील यांनी मार्गदर्शन केले.
यासमयी अमोल पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना, सर्वप्रथम नाभिक समाजाचे आराध्यदैवत श्री संत सेना महाराज यांच्या जयघोषाणे सुरूवात करत, सर्वपित्री अमावस्या असुन आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित असल्याबद्दल आभार मानले, किट वाटप ही संकल्पना वितरण ह्याच उद्देशाने केलेले आयोजन नाही, यातुन एरंडोल, पारोळा व भडगांव विधानसभा मतदारसंघातुन हा समाज संघटीत होवुन हा समाज एकवटावा हेच ह्या कार्यक्रमा मागील मुख्य उद्देश होता. यासह पारोळा शहरातील नाभिक समाज बांधवांना हक्काचे व्यासपीठ म्हणुन उपलब्ध करून दिलेल्या सामाजिक सभागृहसह मतदारसंघातील सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा मांडला.
याप्रसंगी नाभिक समाज बांधवांना प्रातिनिधीक स्वरूपात सलुन किटचे आमदार चिमणराव पाटील व अमोल पाटील यांच्या शुभहस्ते वितरण करण्यात आले. तद्नंतर आमदार चिमणराव पाटील यांनी मुख्य मार्गदर्शन करतांना, भुतकाळापासुन समाजात नाभिक समाजाचे योगदान व महत्वाची मांडणी करत जुन्या रूढी-परंपरेपासुन नाभिक समाजाच्या कार्याचे विश्लेषण केले. आजवर गेल्या ५० वर्षांहुन अधिकच्या राजकारणात मी कधी समाज ह्या विषयावर राजकारण केले नाही, प्रत्येक व्यकी हा माझा समाज व माझा परिवार असल्याचीच माझी भुमिका असल्याचे सांगितले.
याप्रसंगी जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, उपजिल्हाप्रमुख प्रशांत पाटील, जि.प.मा.कृषि सभापती डॉ.दिनकर पाटील, एरंडोल पं.स.मा.सभापती अनिलभाऊ महाजन, बापु पाटील, एरंडोल विधानसभा क्षेत्रप्रमुख सुदामतात्या राक्षे, एरंडोल तालुकासंघटक संभाआबा पाटील, पळासखेडे येथील सुभाषआबा पाटील, तालुकाप्रमुख मधुकरआबा पाटील, धरणगांव बाजार समिती उपसभापती किरणदादा पाटील, जिल्हा दुध संघाचे संचालक रावसाहेब भोसले, पारोळा शहरप्रमुख अमृतभाऊ चौधरी, शेतकी संघाचे उपाध्यक्ष प्रकाशनाना पाटील, संचालक भैय्यासाहेब पाटील, सचिन पाटील, साहेबरावदादा पाटील, शेतकी संघाचे मा.उपाध्यक्ष सखारामनाना चौधरी, नथाबापु पाटील, देवगांव सरपंच समिरदादा पाटील, शेतकी संघाचे संचालक प्रकाश पाटील, एरंडोल युवासेना शहरप्रमुख कृष्णा ओतारी यांचेसह पारोळा, एरंडोल व भडगांव शहरासह तालुक्यातील नाभिक समाज पंच मंडळ, युवक मंडळांचे पदाधिकारी, सदस्य, नाभिक समाज बांधव, पत्रकार, विविध गावांचे आजी-माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य, विविध गावांचा विकासोचे आजी-माजी चेअरमन, व्हा.चेअरमन, संचालक, शिवसेना, युवासेना आजी-माजी पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.