दीपनगर औष्णिक विद्यूत केंद्र परिसरात चोरट्यांचा सुळसुळाट; बंदोस्ताची मागणी

दीपनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दिपनगर येथील औष्णिक विद्युत केंद्राच्या सर्व प्रकल्प आणि वसाहतीमधून दिवसेंदिवस चोरीच्या घटना खूप मोठ्या प्रमाणात वाढीस लागलेल्या असून विद्युत केंद्र प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची उपाय योजना होत नसून प्रकल्पामध्ये चोरांसाठी प्रवेशाकरीता बरेच चोर रस्ते असून चोरी करणारे चोर शिरजोर झाल्याची तसेच सुरक्षा विभाग आणि चोरांमधील आर्थिक चिरीमिरीची चर्चा वसाहतीमधील सुज्ञ नागरीकांमध्ये होत आहे.

वसाहतीमध्ये प्रवेश करण्याकरिता वसाहतीच्या मुख्य प्रवेशद्वारांवर कोणतीही विचारपूस सुरक्षा रक्षकांकडून होत नाही. तसेच वसाहातीमधील काही भाग वसाहतीबाहेरील आंबट शौकीनांचा आणि तरूण-तरूणीचा अश्लिल चाळे करण्याचा अड्डा बनलेला आहे. वसाहतीमध्ये सुरक्षा विभागाने गस्त वाढविण्याची मागणी वसाहतीमधील नागरीकांमधून होत आहे. तसेच काही दिवसांपूर्वी एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचा स्वमालकीचा घरगूती सामान वसाहती मधून बाहेर नेतांना वसाहतीच्या गेट क्रमांक १ वर सदर कर्मचाऱ्यासोबत खूप चूकीच्या प्रकारे सुरक्षा रक्षकांनी वागणूक केली. सदर घरगुती सामान वसाहतीमधून बाहेर काढण्याकरिता सेवानिवॄत्त कर्मचाऱ्याकडे विद्युत केंद्र प्रशासनाद्वारा घेतलेली रीतसर लेखी स्वरूपात परवानगी होती.

सदर ठिकाणी विद्युत केंद्रामधील वेगवेगळ्या कामगार संघटनेचे पदाधिकारी हजर होऊन त्यांनी त्यावेळी कामावर असलेल्या सुरक्षा अधिकाऱ्यांना फोन संपर्क केला असता सदर सुरक्षा अधिकारी कामाच्या ठिकाणी हजर नसून घरी आराम करायला गेल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना समजले.अशा अपमानीत वागणूकीमुळे नियमाने वागणारे वीज कर्मचारी संतप्त झालेले असून चोरांना पाठीशी घालणाऱ्या सुरक्षा विभागाबाबत त्यांच्यामध्ये रोष पहायला मिळाला. तसेच विद्युत केंद्रात प्रवेशा करिता परवानगी देण्यात आलेल्या दुचाकी वाहनांमधून खूप मोठ्या प्रमाणात विद्युत केंद्रातून चोऱ्या होण्याचे प्रकार वाढलेले असून सुरक्षा विभागाकडून विद्युत केंद्रातून बाहेर जाणाऱ्या कोणत्याही दुचाकी वाहनाची तपासणी होत नसल्याचे समजले.यामुळे विद्युत केंद्राच्या सुरक्षेच्या बाबतीत प्रश्न उद्भवत असून भुसावळ विद्युत केंद्राच्या सर्व प्रकल्पाच्या मुख्य अभियंत्यांनी योग्य त्या उपाययोजना करणेकामीची चर्चा विद्युत कर्मचाऱ्यांमध्ये होत आहे.

Protected Content