यावल शहरात श्रमदानातून नितिन सोनारांसह पदाधिकाऱ्यांनी बुजवले महामार्गावरील खड्डे

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल येथील शहरातुन जाणारा बुऱ्हाणपुर अंकलेश्वर हा अत्यंत वर्दळीचा प्रमुख राज्य महामार्गावरील भुसावळ पाँईट ते बुरूज चौकापर्यतच्या रस्त्यावर गेल्या अनेक दिवसांपासून मोठमोठी खड्डे पडल्याने हा रस्ता खड्डेमय झाला असुन सदरचा रस्ता दुरुस्त व्हावा यासाठी विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना यांनी वेळोवेळी निवेदन दिले असून, या मार्गावरील रस्त्यावर वाहन चालवितांना खुड्डा चुकवितांना अंदाज चुकत असल्याने अनेक अपघात घडले आहे. असे असतांना देखील संबधीत विभागाचे या प्रश्नाकडे दुर्लश होत असल्याने अद्याप पर्यंत या रस्त्याच्या मध्यभागी पडलेली मोठमोठी खड्डे अखेर यावल येथील शिवसेना शिंदे गटाचे जळगाव जिल्हा उपसंघटक नितिन सोनार व त्यांच्या सहकारी मित्रमंडळींनी स्वत खर्चाने श्रमदानातुन बुरूज चौका पासुन तर भुसावळ टी पाँईट पर्यंतच्या पडलेले मोठमोठी खड्डे कच्च टाकुन बुजले.

यावेळी शिवसेना शिंदे गटाचे नितिन सोनार, अतुल बडगुजर, रामभाऊ सोनवणे, दिनकर क्षिरसागर,याकुब शेख, अश्पाकअली सैय्यद आदी सामाजिक कार्यकर्त्यांनी या श्रमदानात सहभाग घेतला. नितिन सोनार व त्यांच्या सहकाऱ्यांनी श्रमदानातुन बूजलेले खड्डे बुजण्याचे कार्य केल्याने वाहनधारकांना तात्पुरता का होईना दिलासा मिळाला असुन, नितिन सोनार व त्यांच्या मित्रमंडळीने श्रमदानातुन केलेल्या कार्याचे वाहन धारकांकडून विशेष कौत्तुक केले जात आहे. दरम्यान बुऱ्हाणपुर अंकलेश्वर महामार्गाशी संबधीत अधिकारी यांनी रस्त्याच्या परिस्थितीकडे पाहून दुर्लक्ष न करता तात्काळ दुरुस्त करावा अशी मागणी होत आहे .

Protected Content