जुनोने मार्गे नवीन बसफेरी सुरू; रोहिणी खडसेंचे मानले आभार

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर- बोदवड तालुक्यातील जुनोने येथील ग्रामस्थांनी राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरद पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांच्याकडे मुक्ताईनगर ते बोदवड अशी बसफेरी मुक्ताईनगर कोथळी, बोहर्डी, बेलखेड, जुनोने, मार्गे बोदवड सुरू करण्या बाबत विनंती केली होती. त्यानुसर ही बससेवा सुरू झाल्याने ग्रामस्थांनी रोहिणी खडसे यांचे आभार मानले.

अधिक असे की, बोदवड तालुक्यातील जुनोने व परिसरातील गावांमधील ग्रामस्थांचे बोदवड, व मुक्ताईनगर येथे बाजारहाट, दवाखाना,नातेसंबंध शासकीय व्यावसायिक कामकाजासाठी तसेच विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी बोदवड मुक्ताईनगर येथे दररोज ये-जा असते कोथळी मुक्ताईनगर येथे श्री संत आदिशक्ती मुक्ताईच्या दर्शनासाठी दर एकादशी वारीला कोथळी, मुक्ताईनगर येथे सदर गावातील भाविक भक्त येत असतात.

तसेच या मार्गावर असणाऱ्या उजनी येथे हिंदु मुस्लिम एकतेचे प्रतिक असलेल्या हजरत न्यामतुल्ला शाहवली बाबांचा दर्गा आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. यासर्व नागरिक, ग्रामस्थ, विद्यार्थी, भाविक भक्तांच्या सोयीसाठी मुक्ताईनगर ते बोदवड मुक्ताईनगर, कोथळी, बोहर्डी, ओझरखेडा, बेलखेड, जुनोने, मार्गे बोदवड अशी बसफेरी सुरू करण्याची जुनोने येथील ग्रामस्थांनी राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांच्याकडे केली होती.

ग्रामस्थांच्या या मागणीला अनुसरून रोहिणी खडसे यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे जळगाव विभागीय नियंत्रक भगवान जगनोर आणि मुक्ताईनगर आगरप्रमुख यांच्याकडे पत्रव्यवहार आणि वेळोवेळी पाठपुरावा केला होता त्या अनुषंगाने मुक्ताईनगर ते बोदवड, मुक्ताईनगर कोथळी, बोहर्डी, बेलखेड, जुनोने, मार्गे बोदवड अशी बसफेरी सुरू करण्यात आली आहे. जुनोने येथिल ग्रामस्थांनी पहिल्या बसफेरीचे पुजन करून बसच्या चालक आणि वाहक यांचा सत्कार केला. तसेच रोहिणी खडसे यांचे आभार व्यक्त केले. या नवीन बसफेरी मुळे जुनोने ,बेलखेड, ओझरखेडा, ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण असुन यामुळे ग्रामस्थांना मुक्ताईनगर, बोदवड येथे येणे जाणे करणे सोयीचे होणार आहे.

Protected Content